लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या ‘स्वच्छता ही सेवा’ या पंधरवड्यांतर्गत सोमवारी गांधी जयंतीनिमित्त नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी इतवारी ते आमगावदरम्यान स्वच्छता स्पेशल रेल्वेगाडी चालविण्यात आली. इतवारीपासून आमगावपर्यंतच्या सर्व रेल्वेस्थानकावर स्वच्छतेचे महत्त्व पटवून देणाºया पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले.स्वच्छता स्पेशल रेल्वेगाडीचा शुभारंभ दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक अमित कुमार अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक अर्जुन सिबल उपस्थित होते.इतवारी रेल्वेस्थानकावर प्रवाशांपुढे पथनाट्य सादर केल्यानंतर ही गाडी कामठी, तारसा, भंडारा रोड, तुमसर रोड, तिरोडा, गोंदिया या मार्गाने आमगावला पोहोचली. प्रत्येक रेल्वेस्थानकावर भारत स्काऊट आणि गाईडच्या विद्यार्थ्यांनी प्रवाशांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करणारे पथनाट्य सादर करून प्रवाशांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. या विशेष अभियानांतर्गत रेल्वेस्थानकांवर उद्घोषणा करून प्रवाशांना स्वच्छता राखण्याचे आवाहन करण्यात आले. प्रवाशांनीही या अभियानात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. यावेळी रेल्वेस्थानकावर प्रवासी, विविध भागातील लोकप्रतिनिधी उपस्थित होते.भंडारा रेल्वेस्थानकावर रक्तदान शिबिरस्वच्छता पंधरवड्यानिमित्त स्वच्छता स्पेशल रेल्वेगाडी भंडारा रेल्वेस्थानकावर पोहोचल्यानंतर तेथे स्काऊट गाईडच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले. यावेळी दपूम रेल्वेचे वरिष्ठ विभागीय परिचालन व्यवस्थापक सचिन शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत लायन्स क्लब भंडारा ब्राससिटीच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिरात अधिकारी, कर्मचाºयांनी मोठ्या संख्येने रक्तदान करून आपले योगदान दिले.मेकोसाबाग रेल्वे कॉलनीत श्रमदानदपूम रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक अमित कुमार अग्रवाल यांनी मेकोसाबाग रेल्वे कॉलनीत गांधी उद्यानाचे उद्घाटन करून वृक्षारोपण केले. त्यानंतर मोतीबागच्या पॉलिक्लिनिकमध्ये अधिकारी, कर्मचाºयांना स्वच्छतेसाठी जागरूकता राखण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी अधिकारी, कर्मचाºयांनी दोन तास श्रमदान करून आपले कार्यालय, कार्यालयाचा परिसर स्वच्छ राखण्याची शपथ घेतली. यावेळी अप्पर विभागीय रेल्वे व्यवस्थापक डी. सी. अहिरवार, शाखा अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
रेल्वेस्थानकांवर जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 23:58 IST
दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या ‘स्वच्छता ही सेवा’ या पंधरवड्यांतर्गत सोमवारी गांधी जयंतीनिमित्त नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी इतवारी ते आमगावदरम्यान स्वच्छता स्पेशल रेल्वेगाडी चालविण्यात आली.
रेल्वेस्थानकांवर जनजागृती
ठळक मुद्देदपूम रेल्वेचा पुढाकार : इतवारी ते आमगावपर्यंत स्वच्छतेविषयी प्रबोधन