फेसबुकवर पं. नेहरू, सोनिया गांधींविरोधात अपमानास्पद पोस्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:13 IST2021-03-04T04:13:02+5:302021-03-04T04:13:02+5:30

रामटेक : देशाचे माजी पंतप्रधान दिवंगत पं. जवाहरलाल नेहरू, काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी आणि गांधी परिवाराविरुद्ध फेसबुकवर अपमानास्पद ...

Pt. Nehru, insulting post against Sonia Gandhi | फेसबुकवर पं. नेहरू, सोनिया गांधींविरोधात अपमानास्पद पोस्ट

फेसबुकवर पं. नेहरू, सोनिया गांधींविरोधात अपमानास्पद पोस्ट

रामटेक : देशाचे माजी पंतप्रधान दिवंगत पं. जवाहरलाल नेहरू, काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी आणि गांधी परिवाराविरुद्ध फेसबुकवर अपमानास्पद पोस्ट टाकल्याप्रकरणी भाजपाचे पदाधिकारी भोजू कटरे (रा. रामटेक) यांच्याविरुद्ध रामटेक पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

काँग्रेसचे उदयसिंग यादव आणि स्थानिक कार्यकर्त्यांनी बुधवारी रामटेक पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी भोजू कटरे यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली. मंगळवार, (दि. २) रोजी रात्री ११ ते ११.३० वाजताच्या दरम्यान भोजू कटरे यांनी फेसबुकवर दिवंगत पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याविरुद्ध तसेच सोनिया गांधी व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांविरुद्ध अपमानास्पाद पोस्ट टाकली. त्यामुळे कॉँग्रेस कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या, अशी तक्रार रामटेक पोलीस स्टेशन ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. या पोस्टचे स्क्रीन शॉट तक्रारअर्जासोबत जोडण्यात आलेले आहेत. याची दखल घेत पोलिसांनी भोजू कटरे यांच्याविरुद्ध भादंवि १८६० नुसार कलम ५०० व कलम ५०१ नुसार अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांनी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्याकडे तक्रार पाठवीत चौकशी करण्याची मागणी केली आहे.

Web Title: Pt. Nehru, insulting post against Sonia Gandhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.