सायको किलरची दहशत पोलीस ठाण्याला घेराव
By Admin | Updated: February 4, 2017 02:50 IST2017-02-04T02:50:59+5:302017-02-04T02:50:59+5:30
चाकूहल्ला करून महिला-मुलींमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या सायको किलरच्या तातडीने मुसक्या बांधा,

सायको किलरची दहशत पोलीस ठाण्याला घेराव
संतप्त महिलांची निदर्शने : सक्करदऱ्यात तणाव
नागपूर : चाकूहल्ला करून महिला-मुलींमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या सायको किलरच्या तातडीने मुसक्या बांधा, अशी मागणी करीत संतप्त जमावाने शुक्रवारी रात्री सक्करदरा पोलीस ठाण्याला घेराव घातला. या प्रकारामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता.
३० जानेवारीच्या रात्री चंद्रकला ढेंगे (वय ५०, रा. कर्नलबाग) आणि यांच्यावर रेशीमबाग मैदानाजवळ आणि तासाभरानंतर हनुमाननगर त्रिकोणी पार्कजवळ शोभा ठाकूर (वय ५०) या महिलेवर सायको किलरने चाकूने वार करून या दोन्ही महिलांना गंभीर जखमी केले होते. तत्पूर्वी त्याने हुडकेश्वर, अजनी, सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सहा महिला-मुलींवर हल्ला करून त्यांना जखमी केले. गुरुवारी सकाळी सिद्धेश्वर शाळेजवळ आणि शुक्रवारी सायंकाळी सक्करदऱ्यात पुन्हा दोन महिलांवर हल्ले केल्याची वार्ता पसरली. यामुळे परिसरातील महिला-पुरुष संतप्त झाले. त्यांनी शुक्रवारी रात्री ९ च्या सुमारास सक्करदरा ठाण्यावर धडक दिली. जोरदार घोषणाबाजी करीत सायको किलरला तातडीने अटक करा, अशी मागणी केली.
या प्रकारामुळे परिसरात तणाव निर्माण झाला. माहिती कळताच अनेक वरिष्ठ पोलीस ठाण्यात पोहचले. त्यांनी सायकोला पकडण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू असून, काही ठिकाणी ट्रॅप लावण्यात आल्याचेही सांगितले. त्याला लवकरच पकडण्यात येईल, असे आश्वासन देऊन जमावाला शांत केले.(प्रतिनिधी)