सायको आला रे...

By Admin | Updated: February 6, 2017 01:56 IST2017-02-06T01:56:40+5:302017-02-06T01:56:40+5:30

अजनीतील एका महिलेवर चाकूहल्ला करून तिला जखमी केल्याचे वृत्त शहरभर पसरल्याने उपराजधानीत खळबळ उडाली.

Psycho alexa ray ... | सायको आला रे...

सायको आला रे...

महिलेवर हल्ल्याचा प्रयत्न :
अजनीत तणाव, शहरभर चर्चेला उधाण
नागपूर : अजनीतील एका महिलेवर चाकूहल्ला करून तिला जखमी केल्याचे वृत्त शहरभर पसरल्याने उपराजधानीत खळबळ उडाली. सोशल मीडियावरून घटनास्थळावरील तणावाचे छायाचित्र व्हायरल झाल्याने ही चर्चा तिखट-मीठ लावून पसरविली जाऊ लागली. प्रत्यक्षात एका दुचाकी चालकाने पीडित महिलेचा हात मुरगाळून तिला मारण्याचा प्रयत्न केला. त्याच्याजवळ चाकू होता की नाही, ते प्रत्यक्षदर्शींच्या बयानातून स्पष्ट झाले नाही. त्यामुळे या प्रकरणातील आरोपी ‘तोच सायको’आहे की नाही, ते स्पष्ट नाही, असे पोलीस अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
महिनाभरात अनेक महिला-मुलींवर चाकूहल्ला करणाऱ्या सायकोने उपराजधानीत दहशत पसरविली आहे.अजनीच्या या घटनेने या दहशतीत भर घातली असून, आला रे आला... लांडगा आला...अशासारखी अफवा सर्वत्र पसरली आहे.
घटनास्थळावरील माहितीनुसार, रेखा पवार (वय ३७) असे पीडित महिलेचे नाव आहे. ती अजनीतील नालंदानगरात राहते. या भागातील अ‍ॅड. उईके आणि वैद्य यांच्याकडे ती धुणीभांड्याचे काम करते. नेहमीप्रमाणे ती रविवारी दुपारी आपले काम आटोपून १२.३० ते १२.४५ च्या सुमारास नालंदानगरातून जात असताना काळे कपडे घातलेला मोटरसायकलवरील एक तरुण तिच्याजवळ आला आणि त्याने तिच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. आरोपीने तिचा हात धरताच रेखाने जोरदार प्रतिकार करून आरडाओरड केली. घटनास्थळाच्या बाजूच्या घरी लग्नसमारंभ असल्याने तेथे मोठी गर्दी होती. त्यामुळे अनेक जण धावत आले. ते पाहून आरोपी पळून गेला. प्रारंभी ही घरगुती घटना असल्याचे सांगून काहींनी त्याकडे कानाडोळा केला. मात्र, काहींनी हा ‘सायकोच असावा’ असे सांगितल्याने घटनास्थळी गर्दी वाढू लागली. पाहता पाहता परिसरात तणाव निर्माण झाला. माहिती कळताच अजनी पोलिसांचा ताफा, परिमंडळ ४ चे उपायुक्त रवींद्रसिंग परदेसी

 

Web Title: Psycho alexa ray ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.