शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

धनगरांच्या गाव विकासाकरिता अर्थसंकल्पात निधीची तरतूद करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 19:25 IST

धनगर वाडा वस्ती व अन्य मागास गावांच्या विकास कामांकरिता राज्याच्या आगामी अर्थसंकल्पात निधीची तरतूद करण्यात यावी, अशी मागणी भाजपाचे राज्यसभा सदस्य खा. डॉ. विकास महात्मे यांनी केली आहे.

ठळक मुद्देविकास महात्मे : वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना पत्राद्वारे मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : धनगर वाडा वस्ती व अन्य मागास गावांच्या विकास कामांकरिता राज्याच्या आगामी अर्थसंकल्पात निधीची तरतूद करण्यात यावी, अशी मागणी भाजपाचे राज्यसभा सदस्य खा. डॉ. विकास महात्मे यांनी केली आहे.महाराष्ट्राचे वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना खा. महात्मे यांनी या मागणीसंदर्भात एक सविस्तर पत्रसुद्धा लिहिले आहे. या पत्रात खासदार डॉ. विकास महात्मे यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्रातील गावा-गावातून फिरताना असे लक्षात आले की, धनगर वाड्या व वस्तींमध्ये तसेच संलग्नित गावांमध्ये अतिशय बिकट परिस्थिती आहे. पिण्यासाठी पाणी, रस्ते, नाल्या अशा पायाभूत सुविधा, विद्युत पुरवठा, समाजभवन आदी सुविधा त्यांना अजूनही उपलब्ध झालेल्या नाही. ग्रामीण भागातील विमुक्त व भटक्या जमाती विकासापासून वंचित आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सांस्कृतिक भवनासाठीही अनेक गावांची मागणी आहे. अशी काही वंचित गावे जेथे विकासाची कामे करण्याची नितांत आवश्यकता आहे, अशा काही गावांची नावे मी चिन्हांकित केली असून तेव्हा आगामी अर्थसंकल्पात या गावांसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर बहुउद्देशीय सभागृह बांधण्याकरिता प्रति गाव २० लक्ष रुपये या प्रमाणे तरतूद करावी, जेणेकरून उपरोक्त कामे पूर्णत्वास नेता येतील. आपल्या सरकारचे मुख्य लक्ष्य अंत्योदय हे आहे. ते गाठण्यासाठी हे पाऊल निश्चितच उपयोगी ठरेल, असे स्पष्ट करीत विकास कामांसाठी निधीची तरतूद करण्याची विनंतीही पत्राद्वारे केली आहे.

टॅग्स :Vikas Mahatmeविकास महात्मेBudget 2018अर्थसंकल्प २०१८