नागपूर बायपास रोडवरुन सर्व्हिस रोड द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:27 IST2020-12-11T04:27:16+5:302020-12-11T04:27:16+5:30

गुमगाव : जवळून रुंदीकरण होत असलेल्या नागपूर बाह्य वळण मार्गावरुन गुमगाव परिसरातील अनेक गावांकडे ...

Provide Service Road from Nagpur Bypass Road | नागपूर बायपास रोडवरुन सर्व्हिस रोड द्या

नागपूर बायपास रोडवरुन सर्व्हिस रोड द्या

गुमगाव : जवळून रुंदीकरण होत असलेल्या नागपूर बाह्य वळण मार्गावरुन गुमगाव परिसरातील अनेक गावांकडे रहिवाशांना ये-जा करण्यासाठी सर्व्हिस रोड द्यावा अशी मागणी नागरिकांनी संबंधितांना निवेदन देऊन केली आहे. वाहतुकीची कोंडी होऊ नये तसेच नागरिकांना सोयीचे व्हावे म्हणून नागपूर शहराच्या चहूबाजूंनी गेलेल्या या ६१ किमी.लांब अंतराच्या बाह्य वळण मार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरु आहे. गुमगाव जवळील कोतेवाडा पट्यादेव चौरस्त्यावर पुलाचे काम प्रगतिपथावर असून गुमगाव, कोतेवाडा, वागदरा, वडगाव गुर्जर,धानोली , कान्होली, सालईदाभा, पतंजली, एफ.एस.सी. सारखे मोठे गोडाऊन्स, वृंदावन, फायर आर्कर, संदेश सिटी , तेल्हारा, सेझ, मिहान, एम्स हॉस्पिटल, डोंगरगाव, कान्होली या गावांना ये-जा करण्यासाठी हाच एकमेव रहदारीसाठी शॉर्टकट मार्ग पूर्वीपासून आहे. अतिशय द्रूतगतीने रुंदीकरणातून तयार होत असलेला या बाह्य वळण मार्गावरुन वरील अनेक गावांना सोयीच्या आवागमनासाठी सर्व्हिस रोडची नितांत आवश्यकता आहे. विशेष म्हणजे परिसरातील बहुतांश शेतकऱ्यांची शेती बायपासच्या पलीकडेच आहे. जेथे गाव तेथे सर्व्हिस रोड या निर्देशान्वये गुमगाव नजीकच्या कोतेवाडा पट्यादेव या चौरस्त्यावरील फ्लाय ओव्हर आणि तयार होत असलेल्या नागपूर बायपास रोडवरुन संबंधित गावांसाठीच सर्व्हिस रोड का नाही असा सवाल सर्वत्र विचारला जात आहे. सर्व्हिस रोड व्हावा या मागणीसाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व संबंधित विभागाकडे निवेदन देण्यात आले असून लोकप्रतिनिधीना शिष्टमंडळ विनंती करणार आहे. परिसरातील रहिवाशांची भविष्यात होणारी गैरसोय टाळण्यासाठी सर्व्हिस रोड मंजूर न झाल्यास आंदोलन करण्याचा इशाराही कोतेवाडाच्या सरपंच मनिषा आष्टनकर, माजी सरपंच रवींद्र आष्टनकर, उपसरपंच अशोक फुलकर,थोमेश्वर बावणे, मयूर फुलकर, पन्ना झाडे, चंद्रकांत झाडे, सुनील आष्टनकर, गणपत बावणकर, राजू आष्टनकर, तनय झाडे, राजू कामडी, सुनील बावणे, नंदू झाडे, सुरेंद्र मिश्रा, दिवाकर देवतळे, विनोद बावणे आदींनी दिला आहे.

Web Title: Provide Service Road from Nagpur Bypass Road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.