शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिगोला मोठा दिलासा! डीजीसीएने क्रू विश्रांतीचा नियम मागे घेतला, तरीही उड्डाणे सुरळीत होण्यासाठी काही दिवस लागणार
2
नगरपालिकांची मतमोजणी २१ डिसेंबरलाच; सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाचा निर्णय कायम ठेवला, पण...
3
लहान मुले-वृद्धांनी बेंचवर झोपून रात्र काढली; इंडिगो संकटामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल;..!
4
१ लाखापर्यंतच्या रकमेसाठी समान व्याजदर, RBIकडून सर्व बँकांसाठी नवे नियम; होणार फायदा
5
एअरटेलने स्वस्तातले ३० दिवसांचे दोन प्लॅन बंद केले; आता जास्त पैसे मोजल्याशिवाय पर्याय नाही
6
ना गोवा ना काश्मीर, २०२५ मध्ये लोकांनी 'गुगल'वर 'या' छोट्या शहराला सर्वाधिक केले सर्च
7
प्रवाशांचे हाल! मुंबई-पुण्यासह देशभरातील ६००हून अधिक इंडिगो विमानांचे उड्डाण रद्द!
8
Gold Silver Price Today: सोन्याच्या दरात जोरदार तेजी, चांदीचा दर २ लाखांच्या जवळ; एकाच झटक्यात २४०० रुपयांची तेजी
9
जिद्दीला सलाम ! डोळ्याला इन्फेक्शन... तरीही गॉगल लावून मैदानात उतरला अन् पठ्ठाने शतकच ठोकलं
10
सनी देओल रुपेरी पडद्यावर धमाका करण्यासाठी सज्ज, या दिवशी रिलीज होणार 'बॉर्डर २'चा टीझर
11
आसिम मुनीर यांची ताकद वाढली; पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे 'हे' ५ मोठे अधिकार संपुष्टात!
12
पुतिन-मोदींची 'सरप्राइज राइड', सफेद रंगाच्या Fortuner ची सगळीकडे चर्चा, महाराष्ट्राशी कनेक्शन
13
Matthew Hayden: 'कपडे काढून धावेन' म्हणणारा मॅथ्यू हेडन जो रूटच्या शतकानंतर काय म्हणाला?
14
"आईशप्पथ हे पुन्हा करणार नाही"; तरुणाचा मास्टर प्लॅन बघून स्कॅमरने टेकले हात, लोकेशन कळताच आरोपी घाबरला
15
एआय: महासत्ता की महासंकट?, गरीब-श्रीमंतांमधील...; 'संयुक्त राष्ट्र संघा'ने या तंत्रज्ञानाबद्दल दिला गंभीर इशारा
16
टाटा समूहावर शोककळा! 'लॅक्मे' आणि 'वेस्टसाइड'च्या संस्थापिका सिमोन टाटा यांचे ९५व्या वर्षी निधन
17
इन्स्टावरच्या गर्लफ्रेंडशी लग्न करायला पोहोचला तरुण; वरातही वाजत निघाली अन् अचानक मुलगी फोनच उचलेना..
18
BB 19: "असं संपायला नको होतं...", मालती चहर घराबाहेर गेल्यानंतर प्रणित मोरेची अशी अवस्था
19
काळजी घ्या! फोन नंबरद्वारे तुमचे लोकेशन ही वेबसाईट उघड करतेय; वैयक्तिक डेटा होतोय लीक
20
IND vs SA : श्रेयस अय्यर संघात आल्यावर ऋतुराज गायकवाडचं काय होणार? आर. अश्विन स्पष्टच बोलला
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य सुविधेसाठी ५०० कोटींची तरतूद करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत नागपूर शहरातील आरोग्य यंत्रणा कोलमडली आहे. रुग्णांना बेडसाठी भटकंती करावी लागत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत नागपूर शहरातील आरोग्य यंत्रणा कोलमडली आहे. रुग्णांना बेडसाठी भटकंती करावी लागत आहे. हजारो लोकांचे बळी गेले. त्यात पुन्हा तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. याचा विचार करता शहरातील नागरिकांचा जीव वाचावा, यासाठी महापालिकेने आपली जबाबदारी म्हणून आरोग्य यंत्रणा सक्षम करावी. यासाठी २०२१-२२ या वर्षाच्या मनपा अर्थसंकल्पात ५०० कोटींची विशेष तरतूद करावी, अशी मागणी नगरसेवकांनी केली आहे.

मागील दोन वर्षांचा विचार करता पुढील वर्षाचा महापालिकेचा अर्थसंकल्प २,५०० ते २,७५० कोटींच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे. यात १,३०० ते १,४०० कोटींचा आस्थापनावर खर्च वगळता उर्वरित १,३०० ते १,३५० कोटीतून विकास कामांवर होणारा खर्च आरोग्य सुविधाकडे वळता करावा. यातून महापालिकेची पाच रुग्णालये अपग्रेड करण्यात यावी. येथे बेडची संख्या वाढवून ऑक्सिजन, आयसीयू व व्हेंटिलेटर सुविधा निर्माण करावी. आवश्यक असलेली पदे भरण्यात यावी, अशी मागणी नगरसेवकांनी केली आहे.

काँग्रेसचे नगरसेवक संजय महाकाळकर यांनी सोमवारी या संदर्भात महापौर दयाशंकर तिवारी यांना पत्र दिले. मनपा अर्थकल्पात आरोग्य सुविधासाठी ५०० कोटींचा विशेष निधी उपलब्ध करण्याची मागणी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते दुनेश्वर पेठे यांनीही अशीच मागणी केली आहे. आज विकासापेक्षा नागरिकांचा जीव वाचविणे महत्त्वाचे आहे. सिमेंट रोड, स्मार्ट सिटी प्रकल्पासह प्रस्तावित प्रकल्पाचा निधी आरोग्य सुविधाकडे वळता करावा, अशी मागणी केली. भाजपचे नगरसेवक सतीश होले यांनीही झोन स्तरावर आरोग्य यंत्रणा बळकट करण्यासाठी विशेष निधीची तरतूद करण्याची मागणी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी गटनेते वेदप्रकाश आर्य यांनी अर्थसंकल्पात ४०० ते ५०० कोटींचा निधी आरोग्य सुविधासाठी उपलब्ध करावी. तसेच मनपाचा अर्थसंकल्प तातडीने सादर करून हा निधी उपलब्ध करावा, अशी मागणी केली आहे.

....

विशेष निधीतून या सुविधा निर्माण करा

- कोविड रुग्णांना उपचार मिळण्यासाठी मनपा रुग्णालये सक्षम करा.

-ऑक्सिजन, आयसीयू व व्हेंटिलेटर बेडची संख्या वाढवा.

-मनपा रुग्णालयात ऑक्सिजन प्लांट उभारण्यात यावे.

- कोविड रुग्णांना औधषी उपलब्ध कराव्या.

- मनपा रुग्णालयात डॉक्टर व परिचारिकांची पदे भरण्यात यावी.