शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर विभागातील आदिवासी आश्रमशाळांमध्ये सुविधा पुरवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 22:14 IST

आदिवासी आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी व सुविधा पुरविण्यात याव्यात, असे निर्देश आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांनी येथे अधिकाऱ्यांना दिले.

ठळक मुद्देविष्णू सवरा यांचे निर्देश : ३१ मार्चपर्यंत निधी खर्च करा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आदिवासी आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी व सुविधा पुरविण्यात याव्यात, असे निर्देश आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांनी येथे अधिकाऱ्यांना दिले. तसेच नागपूर विभागातील जिल्हा वार्षिक आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत सन २०१७-१८ चा निधी येत्या ३१ मार्च २०१८ पर्यंत खर्च करावा, अशा सूचनाही केल्या.विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात गुरुवारी आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर विभागातील आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत सन २०१८-१९ चे जिल्हा वार्षिक आदिवासी उपयोजना प्रारूप आराखड्यास मान्यता व सन २०१७-१८ चा झालेल्या खर्चाच्या आढावाबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आदिवासी विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा, सहसचिव सुनील पाटील, विभागीय आयुक्त अनुप कुमार, नागपूर विभागाचे जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, आदिवासी विकास विभागाचे उपसचिव ल. गो. ढोके, सु. ना. शिंदे, आदिवासी विकास विभागाच्या अपर आयुक्त डॉ. माधवी खोडे, उपायुक्त एस. डब्ल्यू. सावरकर, विभागीय आयुक्त कार्यालयातील नियोजन उपायुक्त बी. एस. घाटे, वरिष्ठ संशोधन अधिकारी मिलिंद नारिंगे, नियोजन अधिकारी अमित सुतार उपस्थित होते.नागपूर विभागातील प्रत्येक जिल्ह्याने जिल्हा वार्षिक आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत जिल्हानिहाय देण्यात आलेल्या अंदाजपत्रकानुसार नियोजन सादर केले. मागासवर्गीय कल्याण (विशेष क्षेत्र), गाभा क्षेत्र, बिगर गाभा क्षेत्र आणि नाविन्यपूर्ण क्षेत्र यानुसार जिल्हानिहाय नियोजन सादर करण्यात आले. आश्रमशाळांकडे जाणारे रस्ते, पाणीपुरवठा व्यवस्था, आदिवासीबहुल गावांना वीज जोडणी पुरविणे, २४ तास पाण्याची उपलब्धता, याबाबत माहितीचा आढावा यावेळी घेण्यात आला.नागपूर विभागासाठी ५६५.३९ कोटींचा प्रारूप आराखडाजिल्हा              निधी-----------------------------नागपूर           ७१ कोटी ८४ लक्ष रुपयेवर्धा               २३ कोटी २३ लक्ष रुपयेभंडारा            १४ कोटी १६ लक्ष रुपयेगोंदिया         ७८ कोटी ३ लक्ष रुपयेचंद्रपूर           १३९ कोटी ६९ लक्ष रुपयेगडचिरोली     २३८ कोटी ४१ लक्ष रुपये--------------------------------------एकूण ५६५ कोटी ३९ लक्ष रुपये-----------------------------------

टॅग्स :Schoolशाळाnagpurनागपूर