लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : माध्यमांसमोर वक्तव्य करून काही होणार नाही. जर खरोखर चौकशी हवी असेल, तर मुख्यमंत्र्यांकडे किंवा संबंधित यंत्रणेकडे पुरावे द्यावेत, महसूल विभागातील कथित भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कॉंग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांना खुले आव्हान देत ठोस पुरावे सादर करण्याचे आवाहन केले.
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.
विजय वडेट्टीवार सह विरोधी पक्षातील नेत्यांनी प्रसार माध्यमांसमोर वक्तव्य करून काही होणार नाही. जर खरोखर चौकशी हवी असेल, तर मुख्यमंत्र्यांकडे किंवा संबंधित यंत्रणेकडे पुरावे द्यावेत. कोणताही अधिकारी दोषी आढळल्यास त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल,” असे त्यांनी स्पष्ट केले.
बावनकुळे म्हणाले की, केवळ प्रसिद्धीसाठी संवेदनशील प्रकरणांवर वक्तव्य करणे योग्य नाही. अशा बोलण्यामुळे चौकशी यंत्रणांवर दबाव येऊ शकतो, याचीही काळजी घ्यावी. “कोणत्याही अधिकाऱ्याच्या कुटुंबाबद्दल बोलणे चुकीचे आहे. गोपनीय माहिती असल्यास ती सरकारकडे द्यावी, असे त्यांनी सांगितले.
खरात प्रकरण अतिसंवेदनशील
खरात प्रकरणाबाबत अधिक बोलण्यास त्यांनी नकार देत, “हे अतिसंवेदनशील प्रकरण आहे. चौकशी यंत्रणा आपले काम करत आहे. अशा प्रश्नांमुळे तपासात अडथळा येऊ शकतो,” असे म्हटले.
मोहित कंबोज भेटीवर स्पष्टीकरण
मोहित कंबोज यांच्यासोबतच्या भेटीवर बोलताना बावनकुळे म्हणाले की, सामाजिक व पारिवारिक कार्यक्रमांना सर्वजण जातात. “अदानी-अंबानी यांच्याकडेही जातो, तसेच छोट्या कार्यकर्त्यांकडे गेलो तर त्यात गैर काही नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
वडेट्टीवारांच्या महिला वक्तव्यावर टीका
विजय वडेट्टीवार यांच्या महिला संदर्भातील वक्तव्यावर टीका करत, कोणाच्याही कुटुंबात संशय निर्माण करणारे वक्तव्य करणे अयोग्य आहे. माहिती असल्यास ती सरकारकडे द्यावी, असे त्यांनी सांगितले.
खत दरवाढीच्या अफवा फेटाळल्या
खताच्या किमती वाढणार असल्याच्या अफवा फेटाळत बावनकुळे म्हणाले, सोशल मीडियावर चुकीची माहिती पसरवली जात आहे. साठेबाजी करणाऱ्या दुकानदारांवर सरकार कडक कारवाई करेल. शेतकऱ्यांना कोणताही फटका बसू देणार नाही.”
महसूल विभागात मोठे बदल लवकरच
महसूल विभागातील सुधारणांबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, 1500 चौरस फूटांपर्यंतच्या घरांना कायदेशीर करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील तीन वर्षांत नागरिकांना तहसील कार्यालयात जाण्याची गरज भासणार नाही, अशा सुविधा उभारण्यात येत आहेत.
मुंबईतील 500 फूट घरांवरील करमाफी प्रस्तावावर लवकर निर्णय
एकूणच, महसूल विभागातील पारदर्शकता वाढविण्यासाठी सरकार कटिबद्ध असून, कोणत्याही प्रकारच्या गैरप्रकारांना थारा दिला जाणार नाही, असा ठाम संदेश बावनकुळे यांनी दिला. नवी मुंबईतील डान्स बार प्रकरण मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणणार आहे. एमआयएम व काँग्रेस वादावर एमआयएम स्वतःची वोट बँक वाढवण्याचा प्रयत्न करत असल्याचे बावनकुळे म्हणाले.
Web Summary : Revenue Minister Bawankule challenges Congress leader Vadettiwar to provide evidence of corruption. He assures strict action if officials are found guilty, urging against sensationalizing issues and emphasizing transparency in the revenue department. He also addressed concerns about fertilizer prices and housing decisions.
Web Summary : राजस्व मंत्री बावनकुले ने कांग्रेस नेता वडेट्टीवार को भ्रष्टाचार के सबूत देने की चुनौती दी। उन्होंने आश्वासन दिया कि अधिकारियों के दोषी पाए जाने पर सख्त कार्रवाई की जाएगी, संवेदनशील मुद्दों को सनसनीखेज बनाने के खिलाफ आग्रह किया और राजस्व विभाग में पारदर्शिता पर जोर दिया। उन्होंने उर्वरक की कीमतों और आवास निर्णयों के बारे में चिंताओं को भी संबोधित किया।