हुडकेश्वर-नरसाळ््यात मूलभूत सुविधा उपलब्ध करा

By Admin | Updated: April 17, 2016 02:57 IST2016-04-17T02:57:14+5:302016-04-17T02:57:14+5:30

शहरात नव्याने समावेश करण्यात आलेल्या हुडकेश्वर-नरसाळा भागातील नागरिकांना रस्ते, नाली, पथदिवे,

Provide basic amenities in Hudakeshwar-Narsla | हुडकेश्वर-नरसाळ््यात मूलभूत सुविधा उपलब्ध करा

हुडकेश्वर-नरसाळ््यात मूलभूत सुविधा उपलब्ध करा

नागपूर : शहरात नव्याने समावेश करण्यात आलेल्या हुडकेश्वर-नरसाळा भागातील नागरिकांना रस्ते, नाली, पथदिवे, पाणीपुरवठा, सिवर लाईन या मूलभूत सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी दिले.
या भागातील विकास कामांचा आढावा घेण्यासाठी बावनकुळे यांनी महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात बैठक आयोजित केली होती. महापौर प्रवीण दटके, स्थायी समितीचे अध्यक्ष बंडू राऊ त, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, आयुक्त श्रावण हर्डीकर, मुख्य अभियंताा उल्हास देबडवार, अधीक्षक अभियंता शशिकांत हस्तक आदी उपस्थित होते.
मालमत्ता कर व कर आकारणी, पाणीपुरवठा योजना, पाण्याची पाईपलाईन नसलेल्या भागात टँकरव्दारे पाणी पुरवठा, आरोग्य सुविधा, स्वच्छता, या भागातील रस्त्यांच्या कामाला मंजुरी देताना येणाऱ्या अडचणी सोडवा, या गावांसाठी नवीन जलकुंभ उभारा, भागात नवीन गडर लाईनचा प्रस्ताव तयार करा, दोन्ही गावातील मुख्य रस्त्यांवर एलईडी दिवे लावणे, नाली व नाल्यांचे बांधकाम तातडीने हाती घेण्याचे निर्देश त्यांनी दिले.
या गावांतील साफसफाईसाठी देण्यात आलेल्या सफाई कर्मचाऱ्यांच्या कामाचे आॅडिट करून सर्व परिसराची दररोज स्वच्छता करा, कर आकारणी व कर वसुली केंद्रात नागरिकांसाठी सुविधा निर्माण करा. हुडकेश्वरसाठी १४ कोटी तर नरसाळा गावांसाठी १० कोटीचे विशेष अनुदान उपलब्ध केले आहे. यातून नवीन रस्ते, नाली व नाला बांधकाम करावयाचे आहे. रस्त्यांचा नवीन आराखडा तयार करा, रस्त्याच्या एका बाजूला फूटपाथ निर्माण करा, या भागात १०० बोअरवलेचा प्रस्ताव आहे. ही संख्या ११० पर्यंत वाढविण्याचे निर्देश त्यांनी दिले. यावेळी अजय बोढारे, डी.डी.सोनटक्के, भगवान मेंढे, मनोज लक्षणे, मंजू वाजूरकर, कमल हातीबेड यांच्यासह महावितरण, पाणीपुरवठा, आरोग्य, बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

अचानक शटडाऊ नवर नाराजी
पाटबंधारे विभागाने महापालिकेला विश्वासात न घेता ८ ते १० एप्रिलदरम्यान अचानक शटडाऊ न घेतला. या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती व रामनवमी यासारखे महत्त्वाचे सण असताना पाणीपुरवठा बाधित झाल्याने नागरिकांची गैरसोय झाली. यावर प्रवीण दटके यांनी नाराजी व्यक्त क रुन संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली. यापुढे अधिकाऱ्यांनी महापौर व आयुक्तांसोबतच चर्चा केल्यानंतरच पाणीपुरवठा बंद ठेवावा, असे निर्देश बावनकुळे यांनी दिले.

Web Title: Provide basic amenities in Hudakeshwar-Narsla

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.