इंधन दरवाढीविरोधात भाजपा कार्यालयापुढे निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:09 IST2021-06-09T04:09:51+5:302021-06-09T04:09:51+5:30

नागपूर : युवा सेनेच्या वतीने पेट्रोल-डिझेल दरवाढिविरोधात भाजपा शहर कार्यालयापुढे निदर्शने करीत सायकल मार्च काढला. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात ...

Protests in front of BJP office against fuel price hike | इंधन दरवाढीविरोधात भाजपा कार्यालयापुढे निदर्शने

इंधन दरवाढीविरोधात भाजपा कार्यालयापुढे निदर्शने

नागपूर : युवा सेनेच्या वतीने पेट्रोल-डिझेल दरवाढिविरोधात भाजपा शहर कार्यालयापुढे निदर्शने करीत सायकल मार्च काढला. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार नारेबाजी करण्यात आली. गंगाबाई घाट चौक येथून काढण्यात आलेल्या सायकल मार्चमधील कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण केले आणि भाजपा कार्यालयात पोहोचले. यावेळी युवासेना जिल्हा समन्वयक संदीप रियाल पटेल, जिल्हा सचिव धीरज फंदी, शशिधर तिवारी, शहर प्रमुख अक्षय मेश्राम, सलमान खान, जयसिंह भोसले, आकाश पांडे, दीपक पोहनकर, पवन घुग्गुसकर, पीयूष कुहीकर, कौशिक येरणे, रजत मोहाडीकर, ईशांत गुमगावकर, नीतेश सोनकुसरे, प्रतीक घुले, पापा बैरीकर, शुभम फाले, अमन बन, अनिरुद्ध बन्सोड, वेदांत राऊत, प्रेम गायनेवार, हर्षल हुड, श्रेयस वझरकर, सागर लांजेवार, आशिष खडके, विवेक बाभरे, तेसज गोंधळेकर, मोनू चौखंडे, हर्षल सावरकर, आशिष डोरले, वेदांत फंदी उपस्थित होते.

................

Web Title: Protests in front of BJP office against fuel price hike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.