पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात निदर्शने ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:18 IST2021-02-20T04:18:03+5:302021-02-20T04:18:03+5:30
नासुप्र कर्मचारी संस्थेचा सत्कार समारंभ () नागपूर : नासुप्र कर्मचारी पतसंस्था व नागपूर सुधार प्रन्यास एम्प्लॉईज वेलफेअर असोेसिएशनच्या संयुक्त ...

पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात निदर्शने ()
नासुप्र कर्मचारी संस्थेचा सत्कार समारंभ ()
नागपूर : नासुप्र कर्मचारी पतसंस्था व नागपूर सुधार प्रन्यास एम्प्लॉईज वेलफेअर असोेसिएशनच्या संयुक्त विद्यमाने सर्वसाधारण सभा आणि सेवानिवृत्त कर्मचारी व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. आयोजन संस्थेच्या गणेशनगर येथील सभागृहात झाले. प्रमुख अतिथी म्हणून विभागीय अभियंता श्रीराम कश्यप, अभियंता विनायक झाडे, संस्थेचे मार्गदर्शक राजेश समरीत, अध्यक्ष राजेश मारगमवार, सचिव राजेंद्र परकाडे, प्रवीण डेकाटे, दिलीप हटवार, गुलाब नेवल, शंकर बाभरे, नरेंद्र चौधरी उपस्थित होते.
रस्ते सुरक्षेवर जनजागृती अभियान ()
नागपूर : महिमा बहुउद्देशीय सामाजिक संस्थेतर्फे राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत रस्ते सुरक्षा जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. संस्थेतर्फे पथनाट्याद्वारे जनजागती करण्यात आली. सोबतच कला पथकाच्या माध्यमातून लोकांना जागरूक करण्यात आले. याप्रसंगी आरटीओ नागपूरचे सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी शांताराम फासे, स्नेहा मेंढे, स्वातंत्र्यसेनानी विजय जयस्वाल, परिवहन वाहन निरीक्षक योगेश खैरनार, संजय चव्हाण, अमित कराड, संस्थेचे शीतल पाटील यांच्यासह अन्य संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.