जवानांवरील हल्ल्याचा निषेध करीत 'आप'ने केले पाकच्या बडग्याचे दहन
By जितेंद्र ढवळे | Updated: September 15, 2023 16:21 IST2023-09-15T16:21:42+5:302023-09-15T16:21:49+5:30
हा प्रकार म्हणजे विनाशकाले विपरित बुद्धी असल्याचे शहराध्यक्ष कांबळे यावेळी म्हणाले.

जवानांवरील हल्ल्याचा निषेध करीत 'आप'ने केले पाकच्या बडग्याचे दहन
नागपूर - काश्मीरातील अनंतनाग जिल्ह्यात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात भारतीय लष्कराच्या चार जवानांना वीरमरण प्राप्त झाले. या घटनेचा निषेध व्यक्त करीत शुक्रवारी आम आदमी पार्टीच्या वतीने मारबत मिरवणुकीदरम्यान पाकिस्तानच्या बडग्याचे दहन करण्यात आले.
आम आदमी पार्टीचे प्रदेश संघटन मंत्री भूषण ढाकुलकर, शहराध्यक्ष अजिंक्य कांबळे, शहर महासचिव श्याम बोकडे यांच्या उपस्थित
बडकस चौकात हे आंदोलन करण्यात आले. पाकिस्तानातील अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. तेथील लोक अन्न, वस्त्र, निवाऱ्यासाठी वणवण भटकत आहेत. अशात आपल्या देशातील अराजकता सांभाळण्याऐवजी पाकिस्तान भारतविरोधी कारवाया करीत आहे. हा प्रकार म्हणजे विनाशकाले विपरित बुद्धी असल्याचे शहराध्यक्ष कांबळे यावेळी म्हणाले. या आंदोलनात आम आदमी पार्टीचे शहरातील पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.