नागपुरात धार्मिक स्थळ हटविण्याला विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 23:40 IST2018-09-04T23:39:37+5:302018-09-04T23:40:27+5:30
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नासुप्र व महापालिकेतर्फे शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई के ली जात आहे. मंगळवारी रामेश्वरी येथील धार्मिक स्थळाचे अतिक्रमण काढण्याला नागरिकांनी विरोध केल्याने पथकाचा गोंधळ उडाला होता.

नागपुरात धार्मिक स्थळ हटविण्याला विरोध
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नासुप्र व महापालिकेतर्फे शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई के ली जात आहे. मंगळवारी रामेश्वरी येथील धार्मिक स्थळाचे अतिक्रमण काढण्याला नागरिकांनी विरोध केल्याने पथकाचा गोंधळ उडाला होता.
नासुप्रच्या पथकाने दक्षिण नागपुरातील दोन अनधिकृ त धार्मिक स्थळांचे अतिक्रमण हटविले. प्रथम संजय गांधी नगर, चिखली खुर्द येथे कारवाई करण्यात आली. त्यानतंर पथक रामेश्वरी चौक बाभूळखेडा येथे पोहचले. परंतु नागरिकांनी कारवाईला विरोध दर्शविला. पोलीस बंदोबस्तामुळे पथकाने कारवाई केली. सकाळी ८ वजता सुरू करण्यात आलेली कारवाई रात्री ८ पर्यंत सुरू होती.
नासुप्रचे कार्यकारी अभियंता संजय चिमूरकर, विभागीय अधिकारी (दक्षिण) अविनाश बडगे, संदीप राऊत, नासुप्रचे पथक प्रमुख मनोहर पाटील आदींनी केली.
नियमांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप
दक्षिण नागपुरात नासुप्रतर्फे सुरू असलेल्या अनधिकृ त धार्मिक स्थळे हटविताना भेदभाव होत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. नियमानुसार कारवाई झाली पाहिजे. यामुळे नागरिकांत असंतोष आहे. परंतु विरोधाला न जुमानता पथकाने कारवाई केली. दरम्यान महापालिकेच्या पथकाने शहरातील विविध भागातील फूटपाथवरील अतिक्रमण हटविले.