शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

महानगर शाखेतर्फे काळ्या फिती लावून निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2019 23:50 IST

नाटककार व नागपूर महानगर शाखेचे अध्यक्ष सलीम शेख यांच्या नेतृत्वात काही कलावंत काळे कपडे व कपाळाला काळे कापड बांधून ९९ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या दिंडीत पोहचले. त्यामुळे सुरळीत चाललेल्या नाट्य संमेलनाला पहिल्याच दिवशी निषेधाचे गालबोटही लागले.

ठळक मुद्देनाट्य संमेलनाला पहिल्याच दिवशी निषेधाचे गालबोट

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नाटककार व नागपूर महानगर शाखेचे अध्यक्ष सलीम शेख यांच्या नेतृत्वात काही कलावंत काळे कपडे व कपाळाला काळे कापड बांधून ९९ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या दिंडीत पोहचले. त्यामुळे सुरळीत चाललेल्या नाट्य संमेलनाला पहिल्याच दिवशी निषेधाचे गालबोटही लागले.अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नागपूर शाखेकडून नाट्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. महानगर शाखासुद्धा नाट्यकलावंतांचीच आहे. मात्र या शाखेच्या पदाधिकारी, कलावंतांना संमेलनात विश्वासात न घेता डावलण्यात आल्याचा आरोप सलीम शेख यांनी आधीच नोंदविला होता. आम्ही संमेलनात सहभागी होणार नाही व निषेध नोंदवू असे सलीम शेख यांनी आधीच जाहीर केले होते. त्यानुसार दिंडी सुरू होताना चिटणीस पार्कजवळ हे कलावंत काळ्या फिती लावून मूक निषेध नोंदविण्यास उभे होते. संमेलनास आमचा विरोध नाही व ते सुरळीत पार पडावे, ही आमची इच्छा आहे. मात्र आम्हाला डावलण्यात आल्याचा निषेध आम्ही नोंदवित असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.यादरम्यान अ.भा. मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांनी शिष्टाई करीत सलीम शेख यांच्याशी संवाद साधला. गळाभेट करीत पुढे चर्चा करण्याचा विश्वास देत त्यांना संमेलनात सहभागी होण्याचा आग्रह धरला व ओढतच दिंडीत सहभागीही करून घेतले. सलीम शेख व त्यांचे सहकारी कलावंतही दिंडीच्या संपूर्ण मार्गात पायी चालले.आवडत्या कलावंतांना पाहून थबकले प्रेक्षकशिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळून नाट्य दिंडीला सुरुवात झाली तेव्हा अ.भा. मराठी नाट्य परिषद व नागपूर शाखेचे पदाधिकारी व शहरातील नाट्यकर्मी सहभागी झाले होते. मात्र दिंडी जशी पुढे सरकत गेली तसे टीव्हीवर, चित्रपटांमध्ये दिसणारे एक एक कलावंत दिंडीसोबत जुळत गेले. मोहन आगाशे, मोहन जोशी, तेजश्री प्रधान, के दार शिंदे, डॉ. विलास उजवणे, भरत जाधव, प्रेमा किरण, वैभव मांगले, विनय पाठक, ऐश्वर्या नारकर व अविनाश नारकर, मंगेश कदम, अलका कुबल-आठल्ये, रवींद्र बेर्डे, राजन भिसे, रेशम टिपणीस, तुषार दळवी, संतोष जुवेकर, अभिजित गुरू, मधुरा वेलणकर, डॉ. गिरीश ओक, ऋतुजा देशमुख, वंदना गुप्ते, सुकन्या कुळकर्णी यांच्यासह नाट्य व सिनेक्षेत्रातील दिग्गज या दिंडीत पायी चालत होते व या सर्व आवडत्या कलावंतांना पाहून प्रेक्षकही थबकून गेले.

 

टॅग्स :Natakनाटकagitationआंदोलन