ताजबाग ट्रस्ट व्यवस्थापकांविरुद्ध निषेध आंदाेलन ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:48 IST2021-02-05T04:48:41+5:302021-02-05T04:48:41+5:30
रुबी साेसायटीने ताजबाग ट्रस्टकडून ही जागा रेंटवर घेतली हाेती व ट्रस्टच्या जुन्या सदस्यांनी रेंट ॲग्रीमेंट करून दिले हाेते. ...

ताजबाग ट्रस्ट व्यवस्थापकांविरुद्ध निषेध आंदाेलन ()
रुबी साेसायटीने ताजबाग ट्रस्टकडून ही जागा रेंटवर घेतली हाेती व ट्रस्टच्या जुन्या सदस्यांनी रेंट ॲग्रीमेंट करून दिले हाेते. तेव्हापासून संस्थेच्या माध्यमातून शाळा सुटलेल्या मुली, हिंसापीडित महिलांसाठी कार्य केले जाते. काैटुंबिक हिंसा, याैन हिंसाचाराला बळी पडलेल्या व निराधार, विधवा महिलांना काैन्सिलिंग, लीगल असिस्टन्स, व्होकेशनल ट्रेनिंग, कॉम्प्युटर एज्युकेशन, इंग्लिश स्पीकिंग क्लास व ड्रॉपआऊट विद्यार्थिनींना शिकवून त्यांचे सक्षमीकरण व आत्मनिर्भर करण्याचे प्रयत्न केले जातात. ट्रस्टचे नवे प्रशासक आल्यापासून ही संस्था खाली करण्याचा प्रयत्न केला जात आहे. याच प्रयत्नात प्रशासकांनी संस्थेच्या खाेल्यांना परस्पर टाळे लावले. याबाबत काेणतेही लिखित पत्र त्यांनी दिले नाही. मनपाचे रुग्णालय तयार करण्यात येत असल्याचे कारण दिले आहे, पण मनपाकडूनही अशी काेणती माहिती दिली गेली नाही. यावरून मनमानी कारभार केला जात असल्याचा आराेप करण्यात आला. या संस्थेच्या प्रमुख रुबीना पटेल या गेल्या अनेक वर्षांपासून मुस्लिम महिला सक्षमीकरणाचे कार्य करीत आहेत. त्यांचे कार्य थांबवू नये, अशी मागणी आंदाेलनकर्त्यांनी केली आहे.