कर्ज फेडण्यासाठी अभिनेत्री बनली वारांगना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:07 IST2021-04-12T04:07:37+5:302021-04-12T04:07:37+5:30

नरेश डोंगरे लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - मॉडेलिंग आणि फिल्मी दुनियेचा झगमगाट अनुभवणाऱ्या सिमी (काल्पनिक नाव) चा पाय घसरला ...

The prostitute became an actress to pay off the debt | कर्ज फेडण्यासाठी अभिनेत्री बनली वारांगना

कर्ज फेडण्यासाठी अभिनेत्री बनली वारांगना

नरेश डोंगरे

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - मॉडेलिंग आणि फिल्मी दुनियेचा झगमगाट अनुभवणाऱ्या सिमी (काल्पनिक नाव) चा पाय घसरला अन् ती चक्क वेश्या व्यवसायाच्या गटारगंगेत ढकलली गेली. पोलिसांनी गुरुवारी नागपुरात एका हॉटेलवर छापा टाकून तिला ताब्यात घेतले आणि फिल्मी जगतात वावरणाऱ्या आसामच्या एका ॲक्ट्रेसची धक्कादायक रियल स्टोरी पुढे आली.

ती ३२ वर्षांची आहे. मूळची आसाममधील रहिवासी असलेल्या सिमीने एमबीए केल्यानंतर इव्हेंटच्या माध्यमातून मॉडलिंगच्या क्षेत्रात पदार्पण केले. सुडौल बांधा आणि आकर्षक व्यक्तिमत्त्वाच्या सिमीला मॉडलिंगमध्ये बऱ्यापैकी यश मिळालं. चांगला पैसा मिळू लागला. त्यामुळे ती तिच्या आईसह आसाम सोडून कोलकाता (पश्चिम बंगाल) शहरात दाखल झाली. तेथून ती मॉडेलिंगच्या झगमगाटात वावरू लागली. रॅम्पवर चालतानाच्या तिच्या मादक अदा अनेकांना घायाळ करणाऱ्या ठरल्या. त्यामुळे तिला काही नेट सिरीज आणि अल्बममध्येही काम मिळालं. एका अल्बममध्ये ‘राम तेरी गंगा मैली’तील मंदाकिनीसारखी शुभ्र वस्त्रात पाण्यात भिजलेली तिची पोज पाहून एका दिग्दर्शकाने तिला भोजपुरी सिनेमात ‘आइटम सॉन्ग’ दिले. त्यानंतर तिचे भाव चांगलेच वधारले. रॅम्पवरून फिल्मी दुनियेत आपले पाय भक्कमपणे रोवण्याचा प्रयत्न करणाऱ्या सिमीचा वर्षभरापूर्वी पाय घसरला. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे तिला काम मिळेनासे झाले. झगमगाटाची सवय झाल्याने उंची कपडे, राहणे, खाण्याचा खर्च भागविणे तिला कठीण झाले. त्यामुळे तिने काही जणांकडून रक्कम उधार घेतली. उधारीची रक्कम लाखात पोहोचली. इकडे कोरोना वाढता-वाढता वाढला, तर तिकडे पडद्यावरची दुनिया बंद झाल्यासारखी झाली. आणखी उधार मिळण्याची सोय नव्हती. त्यामुळे पैसे कुठून मिळवावे, असा प्रश्न होता. या प्रश्नाने सिमीला चक्क वेश्या व्यवसायात ढकलले. प्रारंभी चांगली रक्कम मिळत होती. मात्र, ते काही दिवसांनी तिचे भाव गडगडले. काही क्षणाच्या जाहिरातीसाठी लाख रुपये मागणाऱ्या सिमीला आता अडीच हजारात कोणत्याही ग्राहकासोबत शरीरसंबंध प्रस्थापित करण्याची वेळ आली. कोलकाता, बिहार, दिल्लीसह आतापर्यंत ऐकले नसलेल्या गावात ‘मुक्काम’ ठोकण्याची तिच्यावर वेळ आली. गुरुवारी, ८ एप्रिलला रात्री नागपुरात एका हॉटेलमध्ये वेश्या व्यवसाय करताना ती पकडली गेली. ‘रिल’च्या दुनियेत वावरत असल्याने खोटेपणा सहजपणे अंगवळणी पडलेल्या सिमीने बरीच लपवाछपवी केली. मात्र, पोलिसांच्या प्रश्नांपुढे ती फार वेळ टिकाव धरू शकली नाही. मेकअप गळून पडावा तसा तिचा बनाव गळून पडला अन् कर्ज फेडण्यासाठी वेश्या व्यवसायात आल्याचे तिने सांगितले.

---

आखूं की होबे ?

वेश्या व्यवसाय करताना रंगेहाथ दोन अन्य मैत्रीणींसह पकडली गेलेली सिमी सध्या येथील महिला सुधारगृहात दाखल आहे. तिचे नातेवाईक येथे आल्यानंतर त्यांच्यासमोर समुपदेशन करून तिला त्यांच्या ताब्यात दिले जाणार आहे. पोलिसांनी ती नागपुरात असल्याचे तिच्या नातेवाइकांना कळविले आहे. ते येथे आल्यानंतर त्यांच्याशी कशी नजर मिळवायची, आखूं की होबे (आता काय होणार), असे प्रश्न सिमीला सतावत आहेत.

---

Web Title: The prostitute became an actress to pay off the debt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.