शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

वारांगना आक्रमक! स्वातंत्र्यासाठी 'गंगा-जमुना'त आंदोलन बॅरिकेट्स उलथवले टीनाही फेकल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2021 14:01 IST

Agitation Case : चार दिवसांपूर्वी या वस्तीच्या आजूबाजूचे रस्ते पोलिसांनी बेरीकेट लावून बंद केले.

ठळक मुद्देकाही ठिकाणी टीनाही उभ्या केल्या. या वस्तीसाठी पोलिसांनी विशेषाधिकाराचा वापर करून कलम १४४ लागू केले.

नागपूर : अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या गंगा जमुनातील वारांगणांच्या देह विक्रयावर पोलिसांनी घातलेली बंदी आज स्वातंत्र्यदिनी आंदोलकांनी उलथवून टाकली. वेश्यावस्तीला पोलिसांनी लावलेले बॅरिकेट्स उलथवून तेथील टीनाही फेकून दिल्या. विदर्भातील सर्वात मोठी वेश्यांची वस्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गंगाजमुनात वेश्याव्यवसाय बंद करण्यासाठी पोलिसांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. चार दिवसांपूर्वी या वस्तीच्या आजूबाजूचे रस्ते पोलिसांनी बेरीकेट लावून बंद केले.

काही ठिकाणी टीनाही उभ्या केल्या. या वस्तीसाठी पोलिसांनी विशेषाधिकाराचा वापर करून कलम १४४ लागू केले. येथे येणाऱ्या ग्राहकांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला. या कारवाईचा येथील वारांगना सोबतच काही सामाजिक संघटनांनीही तीव्र विरोध केला आहे. राष्ट्रवादीच्या स्थानिक महिला नेत्या ज्वाला धोटे यांनी या कारवाईचा पहिल्या दिवसांपासूनच तीव्र विरोध चालवला आहे. वारांगणाचे आधी पुनर्वसन करा आणि नंतर त्यांना येथून हुसकावून लावा, अशी मागणी त्यांनी केली होती. त्यांच्या जगण्याचा अधिकार हिरावून घेण्याचा अधिकार कुणालाही नसल्याचेही म्हटले होते. पोलिसांनी १४ ऑगस्टपर्यंत येथील बॅरिकेट्स काढले नाही तर १५ ऑगस्टला आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला होता. त्यानुसार पोलिसांनी रविवारी सकाळपासूनच येथे मोठा बंदोबस्त लावला. मोठ्या प्रमाणात महिला पोलिसही नेमले होते. त्याला न जुमानता ज्वाला धोटे आपल्या कार्यकर्त्यांसह येथे पोहोचल्या. त्यांनी वारांगनाना एकत्रित करून कार्यकर्त्याच्या मदतीने पोलिसांनी लावलेले बॅरिकेट्स हटविले. टीनाही काढून टाकल्या. या घडामोडीमुळे गंगा जमुना परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला. माहिती कळताच पोलीस उपायुक्त लोहित मतानी आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जमावाची समजूत काढली.  त्यानंतर वातावरण निवळले.

कलम १८८ अन्वये गुन्हा दाखललकडगंज पोलिसांनी या प्रकरणात रविवारी सायंकाळी आंदोलकांवर साथरोग प्रतिबंधक कायद्याचे कलम १८८ अन्वये गुन्हा दाखल केला.

टॅग्स :agitationआंदोलनnagpurनागपूरPoliceपोलिसProstitutionवेश्याव्यवसाय