शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

प्रस्तावित मेट्रो स्टेशनला दीक्षाभूमीची प्रतिकृती दर्शविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 22:48 IST

नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पातील मेट्रो स्टेशनला दीक्षाभूमीची प्रतिकृती दर्शविण्याबाबत विचार करण्यात येत असल्याचे मेट्रो रेल्वेचे कार्यकारी संचालक नंदनवार यांनी पत्राद्वारे कळविले आहे.

ठळक मुद्देनागपूरच्या वैभवात आणखी भर पडेल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरात मेट्रो रेल्वेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प साकार होत असून, नागपुरात जवळपास ४० स्टेशन्स कार्यान्वित करण्यात येत आहे. यापैकी अनेक स्टेशन्सला ऐतिहासिक रूप देण्यात येत आहे. त्याच धर्तीवर संविधान चौक, अजनी रेल्वे स्टेशन, वर्धा रोड, रहाटे कॉलनी अथवा कोणत्याही मेट्रो स्टेशनपैकी एका स्टेशनला दीक्षाभूमी स्तुपाची प्रतिकृती दर्शविण्याबाबत दीक्षाभूमी स्तूप प्रतिकृती मेट्रो स्टेशनला द्यावी, अशी मागणी दीक्षाभूमी स्तूप प्रतिकृती मेट्रो रेल्वे स्टेशन आॅर्गनायझेशनचे संयोजक सुदर्शन गोडघाटे व डॉ. सोहन चवरे यांनी मेट्रो प्रकल्पाचे मुख्य व्यवस्थापक ब्रिजेश दीक्षित यांच्याकडे केली होती. या निवेदनाची मेट्रोने दखल घेतली असून, नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पातील मेट्रो स्टेशनला दीक्षाभूमीची प्रतिकृती दर्शविण्याबाबत विचार करण्यात येत असल्याचे मेट्रो रेल्वेचे कार्यकारी संचालक नंदनवार यांनी पत्राद्वारे कळविले आहे.नागपूर येथे ऐतिहासिक दीक्षाभूमी असून लाखो अनुयायांसोबत भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती. त्यामुळे नागपूरची ओळख ही आंतरराष्ट्रीय स्तरावर झाली आहे. नागपुरात साकार होत असलेल्या मेट्रो रेल्वे स्टेशनला ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या वास्तूंचे स्वरूप देण्यात येत आहे. त्याच धर्तीवर संविधान चौक येथील महामानवाचा पुतळा असून हा चौक क्र ांतीचे स्फूर्तीस्थान ठरला आहे. तर अजनी रेल्वे स्टेशन येथे दरवर्षी लाखो बौद्ध अनुयायांचे धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पावनपर्वावर आगमन होत असते. तसेच रहाटे कॉलनी वर्धा रोड येथून दीक्षाभूमीचे अंतर अगदी जवळ असल्यामुळे या गोष्टीचे औचित्य साधून या ठिकाणी साकार होत असलेल्या कोणत्याही एका स्टेशनला दीक्षाभूमी येथील स्तुपाच्या प्रतिकृतीचे प्रतिबिंब दाखविल्यास नागपूरच्या वैभवात आणखी भर पडेल. तसेच केंद्र व राज्य सरकार साजरा करीत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवानिमित्त एक अभिवादन व आदरांजली ठरेल, अशा आशयाचे निवेदन संघटनेतर्फे देण्यात आले होते. मेट्रोच्या सकारात्मक कृतीमुळे नागपूरच्या वैभवात आणखी भर पडणार आहे.

 

टॅग्स :Metroमेट्रोDiksha Bhoomi Nagpurदीक्षाभूमी