शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

निवासी शाळा सीबीएसई बनवण्याचा प्रस्ताव धुळखात

By आनंद डेकाटे | Updated: September 14, 2023 13:17 IST

३४ शाळांकड़ून मागवण्यात आले होते प्रस्ताव

नागपूर : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत समाज कल्याण विभागातर्फे चालविल्या जाणाऱ्या अनुसूचित जातीच्या शासकीय निवासी शाळांना सीबीएसई करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे मागील साडे तीन वर्षांपूर्वी ठेवण्यात आला होता. परंतु यावर अजुनही निर्णय न झाल्याने तो धुळखात पडला आहे. 

केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालया अंतर्गत चालविल्या जाणाऱ्या जवाहर नवोदय विद्यालयाच्या धर्तीवर राज्यात २०२२ पासून विभागातर्फे शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्नच्या शाळा सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा राज्यात सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागातर्फे अर्थसंकल्पात करण्यात आली होती. या घोषणेत ३५३ निवासी शाळांना मान्यता दिली गेली. त्यापैकी सध्या ९० शाळा आहेत.

२०११ पासून या निवासी शाळांमध्ये सहावीपासून ते दहावीपर्यंत सेमी इंग्रजी माध्यमातून शिक्षण दिले जाते. प्रत्येक वर्गात ४० विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतो. या निवासी शाळेतून कमीत कमी १५ हजाराच्यावर विद्यार्थी शिकतात. मात्र, अलिकडच्या काळात राज्यात सीबीएसई किंवा आयसीएसई, सीआयएससीई, आयबी सारख्या मंडळांनी देशात शाळा सुरू केल्या आहेत. त्यामुळे श्रीमंत वर्गातील पालक आपल्या पाल्यांना या महागड्या शाळांत प्रवेश देतात. तर गरीब विद्यार्थी शासकीय अनुदानीत खाजगी शाळांमध्ये शिकत आहेत.

या गरीब विद्यार्थ्यांना शासकीय निवासी शाळेत सीबीएसई चे शिक्षण मिळावे याकरिता अर्थमंत्री अजीत पवार यांनी सन २०२०-२१ च्या अर्थसंकल्पात ८ मार्च २०२० रोजी सीबीएसईचे अभ्यासक्रम ९० पैकी ३४ अनुसूचित जातीच्या निवासी शाळेत लागू करण्याची घोषणा केली होती. तत्कालीन आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या कार्यकाळात ३४ शाळांकडून प्रस्ताव मागविण्यात आला होता. मात्र त्यावर अद्यापही निर्णय घेण्यात आलेला नाही.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सामाजिक न्याय विभाग असताना सुद्धा निवासी शाळामध्ये सीबीएसई अभ्यासक्र लागू होत नसेल तरही शाेकांतिकाच म्हणावी लागेल. अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे, यासाठी मुख्यमंत्र्यांनी याकडे जातीने लक्ष देण्याची गरज आहे. 

- अशिष फुलझेले ,सचिव, मानव अधिकार संरक्षण मंच, नागपूर

टॅग्स :Educationशिक्षणSchoolशाळाStudentविद्यार्थी