शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
3
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
4
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
5
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
6
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
7
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
8
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
9
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
10
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
11
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
12
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
13
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
14
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
15
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
16
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
17
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
18
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
19
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
20
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ

टाकून देणाऱ्या बालकांमध्ये मुलींचे प्रमाण ८० टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2019 23:11 IST

माता म्हटले की प्रेम, वास्तल्य, जिव्हाळा, आपुलकी हे सर्व शब्द थिटे पडतात. परंतु काही (कु)माता मुलगी झाली म्हणून जन्माला येणाऱ्या बाळाचा जगण्याचा हक्कच हिसकावून घेतात.

ठळक मुद्देतीन वर्षांत २९३ बालके बेवारस :कुमारी मातांकडून टाकून देणाऱ्या बालकांचे प्रमाण ६० टक्के

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : माता म्हटले की प्रेम, वास्तल्य, जिव्हाळा, आपुलकी हे सर्व शब्द थिटे पडतात. परंतु काही (कु)माता मुलगी झाली म्हणून जन्माला येणाऱ्या बाळाचा जगण्याचा हक्कच हिसकावून घेतात. कुणाला कचराकुंडीत, रस्त्यालगत, एस.टी.बसमध्ये, देवळासमोर, इस्पितळात तर कुणाला थेट अनाथालयात बेवारस सोडून फरार होतात. बाल कल्याण समितीकडून मिळालेल्या माहितीनुसार २०१४ ते २०१७ या कालावधीत शून्य ते सहा वयोगटातील २९३ बालके बेवारस मिळाली. यात कुमारी मातांकडून टाकून दिलेल्या बालकांचे प्रमाण ६० टक्के आहे. बेवारस स्थितीत आढळून येणाऱ्या बालकांमध्ये मुलींचे प्रमाण ८० टक्के आहे.रविवारी रात्री बेलतरोडी मार्गावरील मनीषनगर परिसरात एका चारचाकी वाहनाखाली एक दिवसाची चिमुकली आढळून येताच, पुन्हा एकदा कुमारी माता व नाकारला जाणारा मुलीचा जन्माचा प्रश्न सामोर आला आहे.बदलती जीवनशैली, समाज माध्यमांचे तरुणाईवर असणारे गारुड, लैंगिक शिक्षणाचा अभाव, भिन्नलिंगी आकर्षण यासह अन्य काही कारणांमुळे कुमारी माता होण्याचे प्रमाण वाढले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात हे प्रमाण अधिक असल्याचे राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणात अधोरेखीत झाले आहे. जुन्या आकडेवारीनुसार शहरात हे प्रमाण ६.० टक्के, तर ग्रामीण भागात १०.४ टक्के इतके आहे. साधारणत १५ ते १९ हा वयोगट शालेय व महाविद्यालयात शिक्षण घेणारा असतो. त्यात कुमारी अवस्थेत गर्भवती किंवा माता होण्याचे प्रमाण चिंताजनक असल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे. अनैतिक संबंध, गरिबी, लाचारी व निरक्षरतेमुळे होणारी तरुणींची फसवणूक या मागील मुख्य कारण असल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञाचे म्हणणे आहे.दुसरीकडे, स्त्री म्हणजे आईबापाच्या जीवाला घोर, परक्याघरचे धन. स्त्री म्हणजे हुंड्याचा अकारण भार, या समाजाच्या मानसिकतेला आजही स्त्री-जन्माबाबत कमालीचे औदासिन्य आढळून येते. अलिकडच्या काळात यात सुधारणा होत असलीतरी दुसरी किंवा तिसरी मुलगी झाल्यास तिला टाकून देण्याची मानसिकता अद्यापही कायम असल्याचेही रविवारच्या घटनेतून पुढे आले आहे. बाल कल्याण समितीकडून उपलब्ध माहितीनुसार आई असतानाही गेल्या तीन वर्षांमध्ये शून्य ते सहा वर्षांची २९३ निष्पाप बालके दुधाला मुकली आहेत.त्या चिमुकलीची प्रकृती चिंताजनकरविवारी वाहनाखाली पोलिसांना सापडलेल्या त्या चिमुकलीची प्रकृती चिंताजनक असल्याचे मेडिकलच्या बालरोग विभागातील डॉक्टरांचे म्हणणे आहे. डॉक्टरांनुसार, जन्माला आल्यानंतर तिला मातेचे दूध मिळाले नव्हते. उघड्यावर ठेवण्यात आल्याने थंड पडलेल्या अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या चिमुकलीवर आवश्यक सर्व उपचार सुरू आहेत. तिच्या आरोग्याकडे डॉक्टरांसोबतच मेडिकलचे सामाजिक कार्यकर्ता लक्ष ठेऊन आहेत.

टॅग्स :nagpurनागपूर