मालमत्ताकराचा भार वाढणार
By Admin | Updated: February 22, 2015 02:37 IST2015-02-22T02:37:43+5:302015-02-22T02:37:43+5:30
महापालिकेची आर्थिक स्थिती सावरण्यासाठी कर व कर आकारणी विभाग मालमत्ता करात वाढ करणार आहे. प्रशासन व सत्तापक्षाने याला आधीच हिरवी झेंडी दिली असल्याने

मालमत्ताकराचा भार वाढणार
नागपूर : महापालिकेची आर्थिक स्थिती सावरण्यासाठी कर व कर आकारणी विभाग मालमत्ता करात वाढ करणार आहे. प्रशासन व सत्तापक्षाने याला आधीच हिरवी झेंडी दिली असल्याने शहरातील मालमत्ताधारकांना वाढीव कराचा भार सोसावा लागणार आहे.
शनिवारी मनपाच्या महाल येथील टाऊ न हॉल येथे आयोजित चर्चासत्रात नवीन कर पद्धतीचे सादरीकरण करण्यात आले. ७५ नगरसेवक उपस्थित होते. यात सत्तापक्षासह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, बसपा सदस्यांनी सूचना मांडल्या. योग्य सूचनांचा स्वीकार करून नवीन कर आकारणीची पद्धती अधिक सूकर करण्यात येईल. एप्रिल २०१५ पासून ही पद्धती अमलात आणली जाणार असल्याची माहिती कर व कर आकारणी समितीचे अध्यक्ष गिरीश देशमुख यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.
मालमत्ता कोणत्या भागात आहे. बांधकामाची गुणवत्ता, भवनाचे आयुष्य, वापर व मालकी आदी बाबींचा विचार क रून विविध गटात विभागणी केली जाईल. नवीन धोरणानुसार कर आकारणी करताना भाडेकरू ठेवणाऱ्यांना सवलत देण्यात आली आहे. २० फेब्रुवारीपर्यत मालमत्ता करापासून १६०.६७ कोटींची वसुली झाली. गेल्या वर्षाच्या तुलनेत ती १७.९८ कोटींनी अधिक आहे. विभागाला २२५ कोटींच्या वसुलीचे उद्दीष्ट देण्यात आले आहे. एलबीटी पासून ३३२.६२ कोटींचा महसूल जमा झाला आहे. मुद्रांक शुल्कातून २५ क ोटी प्राप्त झाले असून २८ कोटी येणे आहे. (प्रतिनिधी)