प्रॉपर्टी एक्स्पोला प्रतिसाद
By Admin | Updated: September 21, 2014 01:13 IST2014-09-21T01:13:13+5:302014-09-21T01:13:13+5:30
के्रडाई नागपूर मेट्रोचा चार दिवसीय ‘प्रॉपर्टी एक्स्पो-२०१४’ हिस्लॉप कॉलेजलगत चिटणवीस सेंटर येथे सुरू आहे. एक्स्पोच्या दुसऱ्या दिवशी ग्राहकांचा प्रतिसाद मिळाला. एक्स्पो २२ सप्टेंबरपर्यंत

प्रॉपर्टी एक्स्पोला प्रतिसाद
१७ पॅव्हेलियन व ४४ स्टॉल : ग्राहकांकडून खरेदीसाठी विचारणा
नागपूर : के्रडाई नागपूर मेट्रोचा चार दिवसीय ‘प्रॉपर्टी एक्स्पो-२०१४’ हिस्लॉप कॉलेजलगत चिटणवीस सेंटर येथे सुरू आहे. एक्स्पोच्या दुसऱ्या दिवशी ग्राहकांचा प्रतिसाद मिळाला. एक्स्पो २२ सप्टेंबरपर्यंत सकाळी ११ ते रात्री ९ पर्यंत सुरू राहील. पार्किंगची नि:शुल्क व्यवस्था आहे. याआधीच्या चारही एक्स्पोला ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. शनिवारी ‘वास्तुशास्त्र’ या विषयावर सुशील फत्तेपुरिया यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी उपस्थितांच्या शंकांचे निरसन केले. याशिवाय आयसीएआयच्या नागपूर चॅप्टरने प्रॉपर्टी खरेदीसाठी वित्तीय नियोजन आणि व्यवस्थापन, यावर माहिती दिली. यावर्षी ५० हजार चौरस फूटचा डोम पूर्णत: वातानुकूलित आहे. १७ पॅव्हेलियन आणि ४४ स्टॉल आहेत. ५ हजार चौरस फूट जागा फूड कोर्टसाठी राखीव आहे. याशिवाय लहानांसाठी किड्स झोनची व्यवस्था आहे. एनआयटी आणि मनपाने मान्यता दिलेले प्रकल्प एक्स्पोमध्ये प्रदर्शनार्थ आहेत. प्रॉपर्टीशी संबंधित माहिती त्या त्या कंपनीच्या स्टॉलवर उपलब्ध आहे. नामांकित बँकेतर्फे आर्थिक पुरवठा आणि गृहकर्जासंदर्भात इत्थंभूत माहिती देण्यात येत आहे. एक्स्पोचे मुख्य प्रायोजक एसबीआय आणि गोदरेज प्रॉपर्टीज असून प्रोझोन पाम, पिरॅमिड सिटी आणि लेव्हरेज ग्रूप सहयोगी प्रायोजक आहेत. (वाणिज्य प्रतिनिधी)