दाखल्यांची दलाली

By Admin | Updated: June 6, 2015 01:59 IST2015-06-06T01:59:36+5:302015-06-06T01:59:36+5:30

अहोरात्र अभ्यास करून परीक्षा पास करायची. परंतु जातीचे दाखले व इतर आवश्यक दाखल्यांसाठी शासकीय कार्यालयाच्या

Proof of brokerage | दाखल्यांची दलाली

दाखल्यांची दलाली

नागपूर : अहोरात्र अभ्यास करून परीक्षा पास करायची. परंतु जातीचे दाखले व इतर आवश्यक दाखल्यांसाठी शासकीय कार्यालयाच्या चकरा मारायचा, हे चित्र बदलविण्यासाठी शासन व प्रशासनाच्या पुढाकारातून समाधान शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत. यासोबतच कुठल्याही प्रमाणपत्राचे काम आठ दिवसात पूर्ण करण्याचे निर्देश बजावण्यात आले आहेत, असे असतांना सामान्य विद्यार्थी व नागरिकांना अजूनही दलालाची मदत घ्यावी लागत असल्याची बाब उघडकीस आली आहे. शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतू कार्यालय परिसरात सहा आणि भूमापन कार्यालयाजवळ एका दलालाला पकडण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार जिल्हा प्रशासनानेच ही कारवाई केली हे विशेष.

जिल्हाधिकाऱ्यांचे पुन्हा आवाहन
दरम्यान कुठल्याही प्रमाणपत्रासाठी आता फार काळ वाट पाहावी लागणार नाही. प्रमाणपत्र वितरणाची सुविधा सुलभ झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी प्रमाणपत्रासाठी थेट संपर्क साधावा. कुठल्याही मध्यस्ताची किंवा दलालाशी संपर्क करू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी पुन्हा एकदा केले आहे.

रुपेश बेडसे, सचिन रामटेके, नितीन कर्णेवार, राजेश किरनाके, प्रवीण काळे, शरद तिरपुडे आणि जगदीश चहांदे अशी पकडण्यात आलेल्या दलालांची नावे आहेत. त्यांच्या जवळून जात प्रमाणपत्रासह विविध प्रकारचे प्रमाणपत्र आढळून आले. जिल्हाधिकारी कार्यालयात गेल्या अनेक वर्षांपासून दलाल सक्रिय आहेत.

Web Title: Proof of brokerage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.