शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

आचारसंहितेच्या फेऱ्यात अडकल्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या पदोन्नत्या, नवीन नियुक्त्यांनाही फटका

By गणेश हुड | Updated: May 11, 2024 19:45 IST

जिल्हा परिषदेमध्ये विविध पदांची नवीन भरती प्रक्रिया सुरू झाली होती. या पदांची लेखी परीक्षा देखील झाली होती त्याचे निकाल व अंतिम निवड यादी देखील प्रसिद्ध करण्यात आली होती मात्र त्यापैकी अनेक संवर्गातील नियुक्ती आदेश आचारसंहितेमुळे जारी करण्यात आले नाही.

नागपूर :- केंद्रीय निवडणूक आयोगाने १६ मार्च रोजी लोकसभा निवडणुकीची घोषणा केली. यासोबतच  देशभराम आदर्श आचारसंहितेची अंमलबजाणी सुरू झाली. नागपूर जिल्ह्यात व विभागात १९ एप्रिल व पश्चिम विदर्भात २६ एप्रिल रोजी लोकसभा निवडणुकीचे मतदान पार पडले. मात्र त्यानंतरही जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता कायम असल्याने जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या शेकडो पदोन्नती रखडल्या आहेत.       आचारसंहितेमुळे ज्या संवर्गच्या पदोन्नती रखडल्या आहेत त्यामध्ये सहायक प्रशासन अधिकारी, कनिष्ठ प्रशासन अधिकारी, वरिष्ठ सहाय्यक, कनिष्ठ सहाय्यक, ग्राम विकास अधिकारी, विस्तार अधिकारी (पंचायत, शिक्षण, कृषि, आरोग्य), कनिष्ठ अभियंता, शाखा अभियंता, समाज कल्याण निरीक्षक, सहायक पशुधन विकास अधिकारी, आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सहायक, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, पदवीधर शिक्षक, सहायक व कनिष्ठ लेखा अधिकारी आदी पदांचा समावेश आहे.        जिल्हा परिषदेमध्ये विविध पदांची नवीन भरती प्रक्रिया सुरू झाली होती. या पदांची लेखी परीक्षा देखील झाली होती त्याचे निकाल व अंतिम निवड यादी देखील प्रसिद्ध करण्यात आली होती मात्र त्यापैकी अनेक संवर्गातील नियुक्ती आदेश आचारसंहितेमुळे जारी करण्यात आले नाही.        तरी जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीचे मतदान संपन्न झाल्यामुळे  जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या सेवा विषयक बाबी निकाली काढण्यासाठी आचारसंहिता शिथिल करण्याची मागणी कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ सोहन चवरे, नरेंद्र धनविजय, परसराम गोंडाणे, प्रबोध धोंगडे, अनिल पवार, निरंजन पाटील, अब्दुल गफार आदींनी केली आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषदEmployeeकर्मचारी