प्रतिबंधित पानमसाला, तंबाखूचा साठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:49 IST2021-02-05T04:49:14+5:302021-02-05T04:49:14+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - प्रतिबंधित पानमसाला आणि तंबाखूची वाहतूक करणारे वाहन गुरुवारी सायंकाळी गुन्हे शाखेच्या पथकाने सदरमध्ये पकडले. ...

प्रतिबंधित पानमसाला, तंबाखूचा साठा जप्त
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - प्रतिबंधित पानमसाला आणि तंबाखूची वाहतूक करणारे वाहन गुरुवारी सायंकाळी गुन्हे शाखेच्या पथकाने सदरमध्ये पकडले. या वाहनात अडीच लाखांचा पानमसाला आणि तंबाखू पोलिसांना मिळाला.
एका वाहनात प्रतिबंधित पानमसाला तसेच तंबाखूची खेप जाणार असल्याची माहिती मिळाल्यावरून गुन्हे शाखा युनिट चारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक मेश्राम आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गुरुवारी सायंकाळी ५.३० च्या सुमारास सापळा लावला. सदरमधील अंजुमन स्कूल जवळून संबंधित क्रमांकाचे वाहन जाताना दिसताच पोलिसांनी ते अडवून झडती घेतली. त्यात राजश्री पान मसालाचे११३७ पॅकेट (किंमत २, ४५, ५९२ रुपये) आणि २५, ९२० रुपयांचा ब्लॅक लेबल तंबाखू पोलिसांना आढळला. सदर चाैकातून एमपी २८ पी०२९६ क्रमांकाच्या बसच्या वाहकाकडून हा माल घेतला असून तो जरीपटक्यातील हनुमान मंदिराजवळ असलेल्या विजय किराणा स्टोर्सचा मालक विजय याच्याकडे नेण्यात येणार असल्याचे वाहनचालकाने सांगितले. त्यावरून पोलिसांनी अन्न व सुरक्षा विभागाच्या पथकाला बोलवून घेतले. नंतर हा पानमसाला, तंबाखू तसेच वाहन असा एकूण ५ लाख, २१, ५१२ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. या प्रकरणी गणेश मेघशाम मोहाडीकर आणि विजय किराणा स्टोर्स, जरीपटकाचा विजय नामक मालक या दोघांविरुद्ध सदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
---