शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

समाजाची प्रगती आरक्षणातून नव्हे तर नवी दृष्टी देण्यातून : नितीन गडकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2019 10:32 PM

समाजातील शोषितांना आरक्षण मिळावेच, मात्र समाजाची प्रगती त्यातून होते हे चूक आहे. तर समाजातील माणसाकडून मिळणाऱ्या नव्या दृष्टीतून समाजाची प्रगती होते. महात्मा फुले यांनी अखिल मानव समाजाला हीच नवी दृष्टी दिली, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

ठळक मुद्देमाळी समाजाचे महाअधिवेशन, फुले दाम्पत्याला भारतरत्न मिळण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : समाजातील शोषितांना आरक्षण मिळावेच, मात्र समाजाची प्रगती त्यातून होते हे चूक आहे. तर समाजातील माणसाकडून मिळणाऱ्या नव्या दृष्टीतून समाजाची प्रगती होते. महात्मा फुले यांनी अखिल मानव समाजाला हीच नवी दृष्टी दिली, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या वतीने कविवर्य सुरेश भट सभागृहात अखिल माळी समाज महाअधिवेशन पार पडले. त्या उद्घाटनप्रसंगी ना. गडकरी बोलत होते. अध्यक्षस्थानी उत्तरप्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य होते. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर नंदा जिचकार प्रमुख पाहुणे होते. त्यांच्यासह माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी आमदार कृष्णकांत इंगळे, माजी आमदार वसंतराव मालदुरे, डॉ. केशवराव यावलकर, माजी आमदार अशोक मानकर, संस्थेचे उपाध्यक्ष गुलाब चिकाटे, शेषराव उमप, प्रकाश मौर्य, अशोक मानकर, संस्थाध्यक्ष अरुण पवार आदी उपस्थित होते.गडकरी म्हणाले, महापुरुष कुण्या एका समाजाचे नसतात. त्यांचे अनुकरण संपूर्ण समाज करीत असतो. सामाजिक संघटनांनी त्यांच्या विचारांचे अनुकरण करावे. सामाजिक विकासाच्या संकल्पनेची त्रिसूत्री त्यांनी मांडली. शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक विकास यातून समाजाने मोठे व्हावे. समाजाच्या विकासासाठी समाजातील माणसांनी पुढे यावे. जात महत्त्वाची नसून व्यक्तीचे काम महत्त्वाचे असते. येत्या काळामध्ये ज्ञान ही मोठी शक्ती राहणार आहे, त्यामुळे महात्मा फुले-सावित्रीबाई फुले यांनी सांगितलेल्या मार्गाचा अवलंब करा, असे आवाहन त्यांनी केले.उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य म्हणाले, समाजाची एकजूट महत्त्वाची असते. कोणतेही सामाजिक कार्य एकजुटीतूनच सफल होते. नागपुरातील माळी समाजाच्या मेळाव्यातून एकजुटीचा प्रत्यय आल्याचे सांगून त्यांनी या आयोजनाचे कौतुक केले. सध्या निवडणुकीचा काळ असल्याचा उल्लेख करून ते म्हणाले, लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करतात. समाजाच्या विकासासाठी हे आवश्यक असले तरी आपली मूल्ये आणि समाजपुरुषांची शिकवण कायम राखण्याची गरज आहे.प्रास्ताविकातून प्रा. अरुण पवार यांनी आयोजनामागील भूमिका मांडली. समाजाला राजकीय प्रतिनिधित्वाची गरज असून समाजाच्या एकसंघतेचीही अपेक्षा व्यक्त केली. महाअधिवेशनाच्या निमित्ताने विविध मागण्याही त्यांनी मांडल्या. यावेळी माजी आमदार वसंतराव मालदुरे, बाळासाहेब शिवरकर, प्रकाश मौर्य आदींची भाषणे झाली. डॉ. केशवराव यावलकर यांचा सपत्निक सत्कार करण्यात आला. स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. महाअधिवेशनाला महाराष्ट्रासह परराज्यातून मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते.

 

 

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीcommunityसमाज