मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या प्रगतीवर

By Admin | Updated: October 14, 2015 03:21 IST2015-10-14T03:21:28+5:302015-10-14T03:21:28+5:30

जर्मनीच्या केएफडब्ल्यू बँकेच्या अधिकाऱ्यांनी नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या प्रगतीची प्रशंसा केली आणि हा प्रकल्प वेळेत पूर्ण होईल, ....

Progress in Metro Rail Project | मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या प्रगतीवर

मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या प्रगतीवर

केएफडब्ल्यू बँकेचे अधिकारी खूश
जर्मन बँकेचे मेट्रो रेल्वेला अर्थसाहाय्य : पाच दिवसीय दौरा

नागपूर : जर्मनीच्या केएफडब्ल्यू बँकेच्या अधिकाऱ्यांनी नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या प्रगतीची प्रशंसा केली आणि हा प्रकल्प वेळेत पूर्ण होईल, असा विश्वास व्यक्त केला. केएफडब्ल्यू बँक मेट्रो रेल्वे प्रकल्पाला ३७०० कोटीं रुपयांचे कर्ज देणार आहे. कर्ज बहालीची अंतिम औपचारिकता पूर्ण करण्यासाठी बँकेचे सहा अधिकारी सोमवारी पाच दिवसीय दौऱ्यावर नागपुरात आले आहेत़ यामध्ये पीटर रुनी, रॉबर्ट वोल्कोविक, नीना सिंह, स्टेफनी रिगेर, फेलिक्स क्लोडा आणि पीटर हिंगीस यांचा समावेश आहे. या अधिकाऱ्यांनी नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडचे (एनएमआरसीएल) व्यवस्थापकीय संचालक बृजेश दीक्षित आणि त्यांच्या चमूशी मेट्रो रेल्वे प्रकल्पासंदर्भात विस्तृत चर्चा केली. (प्रतिनिधी)
अधिकाऱ्यांचा एकत्रित दौरा
केएफडब्ल्यू बँक आणि एनएमआरसीएलच्या अधिकाऱ्यांनी काँग्रेसनगर, संत्रा मार्केट, गोल बाजार आदींसह मेट्रो रेल्वे एकीकरणाचा एकत्रित दौरा केला. अधिकाऱ्यांच्या बैठकीत फिडर सेवा, प्रकल्पाचा पर्यावरणीय आणि सामाजिक प्रभाव तसेच नियोजनावर चर्चा केली. बँकेच्या अधिकाऱ्यांनी लोकसंवादाद्वारे लोकांना प्रकल्पाशी जोडण्याच्या ‘एनएमआरसीएल’च्या उपक्रमाची प्रशंसा केली.
७७ टक्के जागेचे अधिग्रहण
या प्रकल्पाला हव्या असलेल्या जमिनीपैकी ७७ टक्के जागेचे अधिग्रहण झाले आहे. ‘एट ग्रेड कॉरिडोर’चे काम वर्धा रोडवर सुरू झाले आहे.
सहा महिन्यात कामे प्रगतिपथावर
बँक अधिकाऱ्यांच्या दौऱ्यासंदर्भात ‘एनएमआरसीएल’चे व्यवस्थापकीय संचालक बृजेश दीक्षित यांनी सांगितले की, मेट्रो रेल्वे प्रकल्पात जर्मनीतील केएफडब्ल्यू बँकेच्या अधिकाऱ्यांनी दाखविलेल्या रुचीसंदर्भात त्यांचे अभिनंदन आहे. अधिकाऱ्यांनी सहा महिन्यातील कामाच्या प्रगतीची प्रशंसा केली. या प्रकल्पाला आंतरराष्ट्रीय मानकानुसार साकार करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. यामध्ये जर्मनीचे सकारात्मक सहकार्य मिळत आहे. केएफडब्ल्यू बँक या प्रकल्पासाठी ३७०० कोटींची राशी कर्जस्वरूपात देणार आहे.

Web Title: Progress in Metro Rail Project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.