हायकोर्टामध्ये मंगळवारपासून प्रत्यक्ष उपस्थितीत कामकाज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 04:12 IST2020-11-28T04:12:47+5:302020-11-28T04:12:47+5:30
न्यायालयीन कामकाज सकाळी १०.३० ते दुपारी १ व दुपारी २ ते ४ अशा दोन सत्रामध्ये होईल. न्यायालयात गर्दी होऊ ...

हायकोर्टामध्ये मंगळवारपासून प्रत्यक्ष उपस्थितीत कामकाज
न्यायालयीन कामकाज सकाळी १०.३० ते दुपारी १ व दुपारी २ ते ४ अशा दोन सत्रामध्ये होईल. न्यायालयात गर्दी होऊ नये याकरिता रोजची प्रकरणे दोन सत्रात विभागण्यात यावी. त्यासंदर्भात प्रकरणांच्या यादीमध्ये ठळक सूचना प्रकाशित करावी असे नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे. या कामकाजासाठी नवीन एसओपी लागू करण्यात आली आहे. प्रत्यक्ष उपस्थितीत सुनावणी घेतलेल्या प्रकरणावर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी घेतली जाणार नाही, न्यायालयात शारीरिक अंतराच्या नियमाचे काटेकोर पालन करावे, न्यायालयात कोणत्याही कामासाठी गर्दी केली जाऊ नये इत्यादी सूचना एसओपीमध्ये नमूद करण्यात आल्या आहेत.