वाडी शहरातील समस्या सोडावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:11 IST2021-06-16T04:11:37+5:302021-06-16T04:11:37+5:30

वाडी : नगर परिषदेमार्फत शहरांतर्गत विविध भागात झालेले बांधकाम निकृष्ट दर्जाचे आहे. खडगाव रोडस्थित शिवाजी स्मारक समोरील रस्त्याची दुर्दशा ...

The problems in Wadi city should be solved | वाडी शहरातील समस्या सोडावा

वाडी शहरातील समस्या सोडावा

वाडी : नगर परिषदेमार्फत शहरांतर्गत विविध भागात झालेले बांधकाम निकृष्ट दर्जाचे आहे. खडगाव रोडस्थित शिवाजी स्मारक समोरील रस्त्याची दुर्दशा झाली आहे. रस्त्यात पाण्याचे डबके साचल्याने वाहन चालक पडून जखमी होण्याच्या घटनात वाढ होत आहे. झाकण तुटल्याने रस्त्यावरील चेंबर्स उघडी आहेत. काही भागात चेंबर्स बुजल्याने दूषित पाणी रस्त्यावर येऊन परिसरात दुर्गंधी पसरली आहे. चौकातील स्ट्रीट लाईट बंद स्थितीत आहेत. नागरिकांच्या या समस्या प्रशासनाने निकाली काढाव्यात सोबतच निकृष्ट बांधकाम करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाई करावी, अशी मागणी करणारे निवेदन शिवसेना तालुका प्रमुख संजय अनासाने यांनी मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले यांना सादर केले. याप्रसंगी संतोष केचे, रूपेश झाडे, मधु मानके, संतोष केशरवानी, किशोर ढगे, विलास भोंगळे, हरीश हिरणवार आदी उपस्थित होते.

===Photopath===

140621\5105img-20210614-wa0155.jpg

===Caption===

शिवसेना पदाधिकारी मुख्याधिकारी यांना निवेदन देताना

Web Title: The problems in Wadi city should be solved