शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
3
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
4
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
5
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

युवकांच्या ‘इनोव्हेशन’ मधून समस्या सुटतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2019 12:13 AM

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नावीन्यपूर्ण संकल्पना जग सुंदर बनवू शकते. यातून शहरातील अनेक समस्या मार्गी लागू शकतात. यासाठी ...

ठळक मुद्देमहापौर इनोव्हेशन अवॉर्ड : महापौरांची संकल्पना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नावीन्यपूर्ण संकल्पना जग सुंदर बनवू शकते. यातून शहरातील अनेक समस्या मार्गी लागू शकतात. यासाठी युवकांची मदत घेतली जात आहे. युवकांना नवीन संकल्पना मांडण्यासाठी महापालिका व्यासपीठ उपलब्ध करणार आहे. यासाठी महापौर इनोव्हेशन अवॉर्ड २०१९ आयोजित के ले जात आहे. अवॉर्डच्या पहिल्या टप्प्यात ‘दि हॅक थॉन’ व दुसऱ्या टप्प्यात ‘द मेअर इनोव्हेशन अवॉर्ड’ असेल. उत्तम क्रिएटिव्ह सोल्युशन देणाऱ्यांना अवॉर्ड देण्यात येणार आहे. सोबतच महापालिका याची अंमलबजावणी करणार आहे.महापौर नंदा जिचकार यांनी मंगळवारी महापौर इनोव्हेशन अवॉर्ड २०१९ संदर्भात पत्रकार परिषदेत माहिती दिली. विद्यार्थ्यांच्या क्रिएटिव्हिटीच्या माध्यमातून अनेक समस्या सहज मार्गी लागणे शक्य आहे. इनोव्हेशन अवॉर्डची सुरुवात या वर्षापासून करण्यात आली आहे. अनेक गुणवंत विद्यार्थी असतात परंतु त्यांना व्यासपीठ उपलब्ध होत नाही. त्यामुळे त्यांच्या कलागुणांना वाव मिळत नाही. अशा गुणवंत विद्यार्थ्यांना अवॉर्डच्या माध्यमातून संधी उपलब्ध होणार आहे.हॅकथॉनच्या माध्यमातून समूह चर्चेसाठी २४ विषय निश्चित करण्यात आले आहेत. यात ग्रीन नागपूर, पिण्याच्या पाण्याचे जतन, अक्षय ऊर्जा स्रोतांचा अधिकाधिक वापर, सुरळीत वाहतुकीसाठी उपाययोजना, ड्रेनेज लाईन सफाई प्रणाली, झीरो वेस्ट मॅनेजमेंट, रेन वॉटर हार्वेस्टिंग, उंच इमारतीत अग्निशमन कार्यासाठी तंत्रज्ञान, मनपा शाळात स्मार्ट कॅम्पेन, फ्लाय अ‍ॅशचा वापर, पौष्टिक अन्नासाठी विशेष झोनचे नियोजन, आठवडी बाजार नियोजन, मनपाच्या विविध विभागात ई-गव्हर्नन्स साधने, कचरा संकलन, निर्माल्य संवर्धन, मनपा रुग्णालय, मोकाट कुत्रे आदी विषयांचा यात समावेश आहे. अवॉर्डसाठी वयोगटानुसार तीन गटात वर्गवारी करण्यात आली आहे. यात ‘अ’ गटात वयोगट १२ ते १६,‘ ब’ गटात १५ ते २० व ‘क’गटात २० वर्षावरील लोकांचा समावेश करण्यात आला आहे.१ फेब्रुवारीपासून हॅकथॉन आयोजन करण्यात येणार आहे. प्रत्येक गटात १० उत्कृ ष्ट चमूची निवड करण्यात येणार आहे. चमूचे काम समस्यांवर पर्याय शोधण्याचे आहे. यासाठी नवीन संकल्पना मांडावयाची आहे. जे या अवॉर्डमध्ये सहभागी होऊ इच्छितात त्यांना ऑनलाईन अर्ज करता येईल. नोंदणीला १६ जानेवारीपासून सुरुवात केली जाणार आहे. नोंदणीची अंतिम तारीख २५ जानेवारी आहे. स्पर्धेसाठी मार्गदर्शन २४ जानेवारीला होईल. ३१ जानेवारीला स्पर्धकांची भेट, १ फे बु्रवारीला मनपा हॅकथॉन व २ मार्चला महापौर इनोव्हेशन पुरस्कार कार्यक्रम होणार आहे. प्रथम पुरस्कार २१ हजार, दुसऱ्या  क्रमांकाला ११ तर तिसऱ्या  क्रमांकाला ५ हजारांचे तीन पुरस्कार राहतील, अशी माहिती महापौरांनी दिली. यावेळी नगरसेवक सुनील अग्रवाल, अपर आयुक्त राम जोशी, डॉ. प्रशांत कडू आदी उपस्थित होते.परीक्षा कालावधीत अवॉर्ड वितरणमहापालिकेच्या स्थापना दिनी २ मार्चला अवॉर्ड वितरण करण्यात येणार आहे. १६ जानेवारीपासून अवॉर्ड नोंदणीला सुरुवात होत आहे. या दरम्यान १० व १२ वीची परीक्षा होणार आहे. अशा परिस्थितीत इनोव्हेशन अवॉर्डच्या आयोजनासंदर्भात प्रश्न निर्माण झाला आहे.

 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाNanda Jichakarनंदा जिचकार