शिवसेना समर्थक आमदाराची जीभ घसरली, काँग्रेसबाबत केले असे विधान...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2021 04:40 PM2021-09-28T16:40:13+5:302021-09-28T16:44:00+5:30

गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीती सरकारमधील नेत्यांमध्ये वेगवेगळ्या मुद्यांवर मतभेद होत असल्याचं दिसून येत आहे. त्यातच आता शिवसेना समर्थक आमदार आशिष जयस्वाल यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर घाणाघाती टीका करत वादाची ठिणगी उडवली आहे.

Pro-Shiv Sena MLA's tongue slipped, statement made ... | शिवसेना समर्थक आमदाराची जीभ घसरली, काँग्रेसबाबत केले असे विधान...

शिवसेना समर्थक आमदाराची जीभ घसरली, काँग्रेसबाबत केले असे विधान...

Next

नागपूर : महाविकास आघाडीमध्ये सत्तेत असलेल्या सहकारी पक्ष काँग्रेसबद्दल वादग्रस्त मत व्यक्त करण्यात आल्याने नवा वाद उफाळण्याची शक्यता आहे. आपल्या मतदारसंघातील एका गावात कार्यकर्त्यांसमोर बोलताना अपक्ष आमदार आणि शिवसेना समर्थक आशिष जयस्वाल यांनी काँग्रेसवर जबर टीका केली आहे.

हे काँग्रेसवाले मेले होते, यांना कोणी विचारत नव्हते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यांना सरकारमध्ये घेतले आणि हे मेलेले लोक जिवंत झालेत, अशा वादग्रस्त शब्दात जयस्वाल यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबाबत खळबळजनक वक्तव्य केलं आहे.  

दोन्ही काँग्रेस पक्षामध्ये गळती लागली होती. यांचे लोक उड्या मारून दुसऱ्या पक्षात जात होते. कोणीही यांना विचारत नव्हते, आज हे मेलेले लोकं जिवंत झाले आहे, असे जयस्वाल म्हणाले. पुढे बोलताना त्यांनी आपण जे वक्तव्य करत आहोत आपण ओपनली सोशल मिडीयावरुन करत आहे, या संदर्भात कोणाला भीत नाही, एकेकाला आपण पुरून उरणार असेही त्यांनी ठणकावून सांगितले आहे. 

त्यावरुन महाविकास आघाडीमधील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असल्याचे दिसत आहे. आता काँग्रेस व राष्ट्रवादीकडून त्यावर उत्तर दिलं जातं की जयस्वाल यांच्या वक्तव्याकडं दुर्लक्ष केलं जातं, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
 

Web Title: Pro-Shiv Sena MLA's tongue slipped, statement made ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app