ऑनलाईन शास्त्रीय कथ्थक स्पर्धेचे बक्षीस वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:43 IST2021-02-05T04:43:53+5:302021-02-05T04:43:53+5:30
नागपूर : कलाविश्व नागपूरतर्फे आयोजित ऑनलाईन शास्त्रीय कथ्थक स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ पार पडला. ललिता हरदास व देवानंद गडीकर ...

ऑनलाईन शास्त्रीय कथ्थक स्पर्धेचे बक्षीस वितरण
नागपूर : कलाविश्व नागपूरतर्फे आयोजित ऑनलाईन शास्त्रीय कथ्थक स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ पार पडला. ललिता हरदास व देवानंद गडीकर यांच्या मार्गदर्शनात या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. संत महिमा भजन, सरगम व कथाकथन अशा तीन फेऱ्यांमध्ये ही स्पर्धा घेण्यात आली. देशातील विविध राज्यांतून यात स्पर्धक सहभागी झाले होते. नागपूर येथील रिध्दी मेहर ही विजेती ठरली तर पुण्याची काव्या आवटे व पुण्याचीच तृषाली कदम या अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या स्थानी राहिल्या. ठाणे येथील आर्या दास, उज्जैन येथील इशा व्यास, बंगळुरु येथील क्षमा अंगोडुमठ यांना प्रोत्साहनपर पुरस्कार प्रदान करण्यात आले. मदन पांडे (नागपूर), रुपल खेडकर (न्यू जर्सी, अमेरिका), मनिषा वडेरा (मध्य प्रदेश), दीप्ती काळे (नागपूर), कविता गोयल (उत्तर प्रदेश) यांनी परीक्षण केले. संदीप काळे, शंकर गाढवे, मोहित केवटे, समीक्षा नियोगी यांचा आयोजनात सहभाग होता.