शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
7
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
8
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
9
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
10
आयोग नव्हे, मतदारच राजा !
11
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
12
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
13
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
14
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
15
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
16
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
17
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
18
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
19
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
20
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

नागपूर विमानतळाचे खासगीकरण लवकरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2018 00:35 IST

राज्य शासनाच्या महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीतर्फे(एमएडीसी)संचालन करणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या खासगीकरणाची प्रक्रिया वर्षापासून सुरू आहे. आता स्पर्धेतील पाच कंपन्या १४ जूनपर्यंत वित्तीय निविदा भरणार आहेत. शिवाय १४ आॅगस्टपर्यंत निविदा प्रक्रिया पूर्ण होईल. या सर्व तारखा निविदेत नमूद असल्याची माहिती महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सुरेश काकाणी यांनी लोकमतशी बोलताना दिली.

ठळक मुद्देपाच कंपन्या स्पर्धेत : १४ जूनपर्यंत वित्तीय निविदा भरणार

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राज्य शासनाच्या महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीतर्फे(एमएडीसी)संचालन करणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या खासगीकरणाची प्रक्रिया वर्षापासून सुरू आहे. आता स्पर्धेतील पाच कंपन्या १४ जूनपर्यंत वित्तीय निविदा भरणार आहेत. शिवाय १४ आॅगस्टपर्यंत निविदा प्रक्रिया पूर्ण होईल. या सर्व तारखा निविदेत नमूद असल्याची माहिती महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सुरेश काकाणी यांनी लोकमतशी बोलताना दिली.मिहान प्रकल्पात विमानतळ विकासाचा समावेश आहे. आघाडी सरकारच्या काळात पाच वर्षे निविदा रखडली. २०१६ च्या प्रारंभी निविदा निघाली. स्पर्धेत १२ कंपन्या होत्या. त्यातील टाटा रिअ‍ॅलिटी, जीएमआर इन्फ्रा, जीव्हीके, पीएनसी इन्फ्राटेक व एस्सेल इन्फ्रा या पाच कंपन्या पात्र ठरल्या. पण त्यानंतर प्रक्रियेची गती संथ आहे.निविदा प्रक्रियेत पात्र ठरलेल्या पाच कंपन्यांना देण्यात येणारा प्रारूप सवलत करारनामा(ड्राफ्ट कन्सेशन अ‍ॅग्रीमेंट)आणि महसूल प्रस्तावाला(आरएफपी)राज्याच्या कॅबिनेट बैठकीत मंजुरी मिळाली. खासगीकरणात ७४ टक्के समभाग कंपनीकडे जातील आणि राज्य व केंद्राची भागीदारी १३-१३ टक्क्यांवर येणार आहे.कंत्राट मिळालेल्या कंपनीला १९८२ कोटी रुपये खर्चून नवीन विमानतळ उभे करायचे आहे. पहिल्या टप्प्यात १४२० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीत दोन समांतर धावपट्ट्या कार्गो आणि टर्मिनल इमारत तसेच विविध एमआरओंचा समावेश आहे. पुढील तीन टप्पे ५४० कोटी रुपयांचे आहेत. विमानतळ खासगीकरणाचा राज्य शासनाचा पहिलाच प्रकल्प आहे. प्रक्रियेत कुठल्याही अडचणी येऊ नयेत, याची काळजी शासन घेत असल्याचे काकाणी यांनी सांगितले.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar International Airportडॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूरnagpurनागपूर