खासगी बस उलटली, चार ठार

By Admin | Updated: May 28, 2017 14:03 IST2017-05-28T14:03:20+5:302017-05-28T14:03:20+5:30

चंद्रपूर महामार्गावरील जाम नजीक दुचाकीला वाचिवण्याच्या प्रयत्नात खासगी वाहतूक करण्याच्या बसला अपघात झाला. या भीषण अपघातात चार जण जागीच ठार झाले तर तीस जण किरकोळ जखमी झाले आहेत.

The private bus took off, four killed | खासगी बस उलटली, चार ठार

खासगी बस उलटली, चार ठार

आॅनलाईन लोकमत
वर्धा - नागपूर - चंद्रपूर महामार्गावरील जाम नजीक दुचाकीला वाचिवण्याच्या प्रयत्नात खासगी वाहतूक करण्याच्या बसला अपघात झाला. या भीषण अपघातात चार जण जागीच ठार झाले तर तीस जण किरकोळ जखमी झाले आहेत. या अपघातात मृतांची संख्या वाढण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे. हा अपघात रविवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडला.
एम.एच.४९ जे. ८५१५ क्र मांकाची बस हिंगणघाटकडे प्रवासी जात होती. दरम्यान जामलगतच्या शेडगाव चौरस्त्यावर उभ्या असलेल्या दुचाकीला वाचविण्याच्या प्रयत्नात रस्ता दुभाजकावर आदळून रस्त्याच्या कडेला उलटली गेली. यात दुचाकीवर असलेल्या दोघांना बसने चिरडले तर बसचा वाहक व एक प्रवासी बसखाली दबले गेले. घटनेची माहिती मिळताच समुद्रपूर व जाम पोलिसांनी घटनास्थळ गाठत जखमींना बसमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू केले. तर जखमींना रूग्णालयात नेण्यासाठी रूग्णवाहिकांना पाचारण करण्यात आले.
अपघाताग्रस्त गाडी सरळ करण्याचे प्रयत्न सुरू असून तिच्या खाली आणखी काही प्रवासी दबले असल्याची शक्यता आहे

Web Title: The private bus took off, four killed