खाजगी बसधारकांनी सुधारित मानक पद्धतीचे पालन करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2020 09:29 IST2020-11-22T09:29:59+5:302020-11-22T09:29:59+5:30
खाजगी प्रवासी बस ऑपरेटर यांनी वाहन स्वच्छ व निर्जंतुकीकरण केलेल्या स्थितीत ठेवणे आवश्यक आहे. त्यानुसार कंत्राटी बसचालकाने त्यातून प्रवास ...

खाजगी बसधारकांनी सुधारित मानक पद्धतीचे पालन करावे
खाजगी प्रवासी बस ऑपरेटर यांनी वाहन स्वच्छ व निर्जंतुकीकरण केलेल्या स्थितीत ठेवणे आवश्यक आहे. त्यानुसार कंत्राटी बसचालकाने त्यातून प्रवास करणारा पर्यटक गट बदलताना तसेच प्रवासाच्या प्रत्येक दिवशी, प्रत्येक फेरीअंती प्रवासी बसचे निर्जंतुकीकरण करावे. बसचे आरक्षण कक्ष, कार्यालय, चौकशी कक्ष स्वच्छ ठेवावे व उपस्थित कर्मचाऱ्यांनी मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा. बसेस जेथे उभ्या आहेत, तेथे गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी. मास्क परिधान न केलेल्या प्रवाशांना प्रवेश देऊ नये. बसच्या प्रवेशदाराजवळ सॅनिटायझर ठेवण्यात यावे. बसमध्ये काही अतिरिक्त मास्क ठेवण्यात यावेत. बसमध्ये प्रवेश करणाऱ्या प्रवाशांची थर्मल गनद्वारे तपासणी करण्यात यावी.