खासगी एजन्सी येईल वीज कापून जाईल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:08 IST2021-02-14T04:08:16+5:302021-02-14T04:08:16+5:30
कमल शर्मा नागपूर : महावितरणच्या थकबाकीदारांचे वीज कनेक्शन कापण्यास राजकीय विरोध होत असताना यासाठी सुरु करण्यात आलेल्या मोहिमेत बाहेरील ...

खासगी एजन्सी येईल वीज कापून जाईल
कमल शर्मा
नागपूर : महावितरणच्या थकबाकीदारांचे वीज कनेक्शन कापण्यास राजकीय विरोध होत असताना यासाठी सुरु करण्यात आलेल्या मोहिमेत बाहेरील शक्तींची साथ घेण्यात येत आहे. खासगी एजन्सीजचे कर्मचारी घरोघरी जाऊन वीज कापण्याची धमकी देत वसुली करीत आहेत. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी ही बाब मान्य करून कर्मचारी कमी असल्यामुळे आऊटसोर्सिगची (खाजगी एजन्सी) मदत घेण्यात येत असल्याचे सांगितले.
महावितरणने ८ सप्टेंबर २०२० रोजी शहरातील तीन विभाग गांधीबाग, सिव्हील लाईन्स आणि महालचे कामकाज फ्रेंचाईसी एनएनडीएलने सांभाळले. कर्मचारी कमी असल्यामुळे फ्रेंचाईसीच्या कर्मचाऱ्यांना आऊटसोर्सिंगच्या माध्यमातून देखभालीच्या व दुरुस्तीच्या कामासाठी ठेवण्यात आले. आजही केसंस व न्युक्लियस नावाच्या दोन एजन्सी या कामासाठी मनुष्यबळ पुरवित आहेत. जवळपास ३५० कर्मचारी या कामासाठी तैनात आहेत. निविदेनुसार हे कर्मचारी विशेषत्वाने मेन्टेनन्स (देखभाल आणि दुरुस्ती) साठी नियुक्त करण्यात आले आहेत. परंतु आता त्यांना वसुलीसारख्या संवेदनशील मोहिमेत सामील करून घेण्यात आले आहे. हे कर्मचारी आता घरोघरी जात आहेत. त्यांना याबाबत कोणतेही प्रशिक्षण देण्यात आलेले नाही. अनेक ठिकाणी या कर्मचाऱ्यांनी ग्राहकांसोबत अभद्र व्यवहार केल्याच्या तक्रारी आहेत. ते स्वत:ला महावितरणचा कर्मचारी सांगून हे काम करीत आहेत. त्यांच्या माध्यमातून मोहिमेत असामाजिक तत्व सामील होण्याची शक्यता नाकारता येत नाही. महावितरणच्या सूत्रांनुसार वसुलीसारख्या संवेदनशील कामात कंपनीच्या कर्मचाऱ्यांनाच तैनात करण्याचा नियम आहे. महावितरणचे बहुतांश कर्मचारी मागील वर्षी शहरात रुजू झाले. अशा स्थितीत ते शहरातील वस्त्यांशी अनभिज्ञ आहेत. ते आपल्या स्तरावर खाजगी कर्मचाऱ्यांची मदत घेत आहेत.
...........
काम एका कंपनीत, ओळखपत्र दुसऱ्या कंपनीचे
खासगी एजन्सीत अनेक कर्मचाऱ्यांकडे वैध ओळखपत्र सुद्धा नाही. दोन दिवसांपूर्वी असेच दोन कर्मचारी छापरुनगर चौकातील एका अपार्टमेंटमध्ये वसुलीसाठी गेले. त्यांच्याशी बातचीत करताना ग्राहकाला त्यांच्यावर संशय आला. त्यांना ओळखपत्र मागितले असता त्यांनी ते दिले. परंतु त्यांच्याजवळ जे ओळखपत्र होते, त्या कंपनीचे कंत्राट आधीच संपले होते. या ओळखपत्रावर नियम धाब्यावर बसवून महावितरणच्या लोगोचा उपयोग करण्यात आला आहे.
संशय असल्यास ओळखपत्र मागा
महावितरणचे अधीक्षक अभियंता अमित परांजपे यांनी सांगितले की २०१९ मध्ये पूर्ण शहरात कंपनीने कामकाज सांभाळले आहे. एनएनडीएलच्या कर्मचाऱ्यांना आऊटसोर्सिंगच्या माध्यमातून समाविष्ट करण्यात आले आहे. नागरिकांना संशय आल्यास वसुलीसाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना ओळखपत्र मागण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
..........