शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

कैद्यांची कमाई सव्वातीन कोटींहून अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 23:27 IST

विविध कारणांमुळे कायम चर्चेत राहणाऱ्या नागपूर मध्यवर्ती कारागृहात मोठ्या प्रमाणावर कैदी विविध कामदेखील करत असतात. २०१७ पासून १४ वर्षांत या कैद्यांनी केलेल्या निरनिराळ्या कामांतून थोडेथोडके नव्हे तर चक्क सव्वातीन कोटींहून अधिकचे उत्पादन केले आहे. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.

ठळक मुद्देमध्यवर्ती कारागृहातील १४ महिन्यांची आकडेवारी : विणकामातून सर्वाधिक उत्पन्न

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विविध कारणांमुळे कायम चर्चेत राहणाऱ्या नागपूर मध्यवर्ती कारागृहात मोठ्या प्रमाणावर कैदी विविध कामदेखील करत असतात. २०१७ पासून १४ वर्षांत या कैद्यांनी केलेल्या निरनिराळ्या कामांतून थोडेथोडके नव्हे तर चक्क सव्वातीन कोटींहून अधिकचे उत्पादन केले आहे. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी नागपूर कारागृहात किती कैदी आहेत, कैदी कुठल्या प्रकारचे काम करतात व त्यातून किती उत्पन्न प्राप्त झाले याबाबत नागपूर मध्यवर्ती कारागृहाकडे विचारणा केली होती. यावर मिळालेल्या माहितीनुसार जानेवारी २०१७ ते फेब्रुवारी २०१८ या कालावधीत कैद्यांनी केलेल्या कामातून कारखाना विभागाला ३ कोटी ३७ लाख ४९ हजार ५१ रुपयांचे उत्पन्न झाले. या कामांमध्ये सुतारकाम, विणकाम, यंत्रमाग, शिवणकाम, लोहारकाम, बेकरी, कार वॉशिंग व धोबीकाम यांचा समावेश आहे. सर्वाधिक ९२ लाख ४८ हजार ७०६ रुपयांचे उत्पन्न हे विणकामातून मिळाले.दोन महिन्यांत उत्पन्नात वाढ२०१७ या वर्षभरात मध्यवर्ती कारागृहातील कारखाना विभागाचे एकूण उत्पन्न हे २ कोटी ६७ लाख ९६ हजार १४२ इतके होते. दर महिना सरासरी उत्पन्न हे २२ लाख ३३ हजार इतके होते. जानेवारी व फेब्रुवारी २०१८ या दोन महिन्यांतच कारखाना विभागाने ६९ लाख ५२ हजार ९०९ रुपयांचे उत्पादन केले. २०१७ च्या तुलनेत २०१८ मधील सरासरी उत्पन्नात वाढ दिसून आली.कामनिहाय उत्पन्नकाम               उत्पन्नसुतारकाम     ६४,८८,२८७विणकाम       ९२,४८,७०६पॉवरलूम       ५०,६२,९३१टेलरिंग          १९,९०,२२४लोहारकाम     ६९,९६,३०९बेकरी           २०८४,५१०कार वॉशिंग   १२,३८,५७१लॉन्ड्री           ६,३९,५१३कारागृहात फाशी मिळालेले २७ कैदीदरम्यान, नागपूर मध्यवर्ती कारागृहात फाशीची शिक्षा मिळालेल्या २७ कैद्यांना ठेवण्यात आले आहे. यात दोन महिलांचादेखील समावेश आहे तर दोन कैद्यांना अंडासेलमध्ये ठेवण्यात आले आहे. शिवाय कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेले ३६७ कैदी, सक्षम कारावास भोगत असलेले ४१४, मोक्का अंतर्गत ८४ यांचादेखील समावेश आहे. ८ नक्षलवादीदेखील याच कारागृहात कैद आहेत. नागपूर मध्यवर्ती कारागृहात ९ विदेशी कैदीदेखील आहेत. कारागृहात एकूण २ हजार १७८ कैदी शिक्षा भोगत आहेत. यात ६३ महिला कैद्यांचादेखील समावेश आहे.

 

टॅग्स :jailतुरुंगnagpurनागपूर