शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

कैद्यांचा तुरुंगाधिकाऱ्यावर हल्ला : नागपूर मध्यवर्ती कारागृहात खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2019 22:53 IST

हत्येच्या आरोपात कारागृहात असलेल्या दोन कैद्यांनी तुरुंगाधिकाऱ्यावर हल्ला चढवून मारहाण केली. शनिवारी सकाळी ९.४५ च्या सुमारास ही घटना घडली. यामुळे काही वेळेसाठी कारागृहात मोठी खळबळ उडाली होती.

ठळक मुद्देदोघांना अटक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : हत्येच्या आरोपात कारागृहात असलेल्या दोन कैद्यांनी तुरुंगाधिकाऱ्यावर हल्ला चढवून मारहाण केली. शनिवारी सकाळी ९.४५ च्या सुमारास ही घटना घडली. यामुळे काही वेळेसाठी कारागृहात मोठी खळबळ उडाली होती. सागर कैलास जयस्वाल आणि रिजवान नाजीर महाजन, अशी आरोपी कैद्यांची नावे आहेत.सागर आणि रिजवान हे दोघेही हत्येच्या आरोपात कारागृहात बंदिस्त आहेत. नेहमीप्रमाणे आज सकाळी तुरुंगाधिकाऱ्यांनी कारागृहात राऊंड घेतला. ९.४५ वाजता बडी गोल क्रमांक १ जवळच्या कॅन्टीनमध्ये हे दोघे एकत्रपणे चर्चा करताना दिसल्याने तुरुंगाधिकारी उमेश लक्ष्मण नाईक (वय ३१) यांनी त्यांना हटकले. तुम्ही एकत्र राहू नका, असे सांगून त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी जाण्यास सांगितले. त्यावरून सागर आणि रिजवान चिडले. त्यांनी संगनमत करून नाईक यांच्यासोबत वाद घातला. त्यांना आवरण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी नाईक यांना मारहाण केली तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकारामुळे कारागृहात एकच खळबळ उडाली.कारागृहातील इतर कैदी तसेच रक्षकांनी धाव घेऊन हा वाद सोडवला. त्यानंतर नाईक यांनी धंतोली ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी सागर तसेच रिजवानविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला.

 

 

टॅग्स :jailतुरुंगnagpurनागपूर