शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांच्या ताब्यातून जन्मठेपेचा कैदी फरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 22:07 IST

खुनाच्या आरोपात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला नागपूरच्या मध्यवर्ती तुरुंगातील कैदी पोलिसांच्या ताब्यातून फरार झाला. ही घटना २७ नोव्हेंबर रोजी जळगाव येथील बोदवडजवळ घडली. या घटनेमुळे पोलिसांमध्ये खळबळ उडाली आहे. सतीश ऊर्फ छोट्या जयमुख काळे रा. तळोजा, नाशिक असे फरार कैद्याचे नाव आहे. सतीश सराईत गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध खुनासह अनेक गुन्हे दाखल आहेत. तळोजा येथील तुरुंगात त्याचे अनेक प्रतिस्पर्धी बंद असल्याने सतीशला नागपूरच्या मध्यवर्ती तुरुंगात ठेवण्यात आले होते.

ठळक मुद्देधावत्या रेल्वेतील घटना : नागपूरच्या मध्यवर्ती तुरुंगात होता कैद

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : खुनाच्या आरोपात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला नागपूरच्या मध्यवर्ती तुरुंगातील कैदी पोलिसांच्या ताब्यातून फरार झाला. ही घटना २७ नोव्हेंबर रोजी जळगाव येथील बोदवडजवळ घडली. या घटनेमुळे पोलिसांमध्ये खळबळ उडाली आहे. सतीश ऊर्फ छोट्या जयमुख काळे रा. तळोजा, नाशिक असे फरार कैद्याचे नाव आहे. सतीश सराईत गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध खुनासह अनेक गुन्हे दाखल आहेत. तळोजा येथील तुरुंगात त्याचे अनेक प्रतिस्पर्धी बंद असल्याने सतीशला नागपूरच्या मध्यवर्ती तुरुंगात ठेवण्यात आले होते.नाशिकच्या एका न्यायालयात सतीशची पेशी होती. यासाठी त्याला नाशिकला नेले जात होते. २६ नोव्हेंबर रोजी शहर पोलिसचे चार सशस्त्र जवान सतीशसोबत नाशिकसाठी नागपूर सेवाग्रामने रवाना झाले. मिळालेल्या माहितीनुसार, २७ नोव्हेंबर रोजी पहाटे जळगाव येथील बोदवड स्टेशनजवळ पोलिसांच्या हातावर तुरी देऊन सतीश फरार झाला. तो फरार झल्याचे पोलिसांना खूप उशिरा लक्षात आले. त्यानंतर सतीशचा शोध घेण्यात आला, परंतु यश आले नाही. पोलिसांनी बोदवडच्या रेल्वे पोलिसांना सूचना दिली. तिथे सतीशच्या विरुद्ध पोलीस ताब्यातून फरार झाल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला.रेल्वेतून गुन्हेगार फरार होण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. पोलिसांना सतर्क राहण्याचे निर्देश वेळोवेळी देण्यात आलेले आहेत. त्यामुळेच सराईत गुन्हेगारांना घेऊन जाताना सशस्त्र पोलीस कर्मचाऱ्यांना तैनात केले जाते. सतीश कुख्यात गुन्हेगार आहे. त्यामुळे पोलिसांनी गांभीर्याने त्याच्यावर पाळत ठेवायला हवी होती. तेव्हा पोलिसांच्या निष्काळजीपणामुळेच सतीश फरार झाल्याचे दिसून येते. तो फरार झाल्याने नाशिक पोलिसही सतर्क झाले आहेत.कर्मचाऱ्यांवर कारवाईची शक्यताशहर पोलिसांनी या घटनेची चौकशी सुरू केली आहे. पोलीस कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे यापूर्वीही गुन्हेगार फरार झाले आहेत. सतीशवर पाळत ठेवणारे कर्मचारी मुख्यालयातील असल्याचे सांगितले जाते. त्यांच्याविरुद्ध कारवाई होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यासंबंधात डीसीपी मुख्यालय गजानन राजमाने यांनी सांगितले की, या घटनेची चौकशी केली जात आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीjailतुरुंग