सुविधांच्या निर्मितीला प्राधान्य
By Admin | Updated: September 1, 2014 01:08 IST2014-09-01T01:08:43+5:302014-09-01T01:08:43+5:30
ग्रामीण भागातील नागरिक अजूनही काही मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. त्यामुळे त्यांना त्रासही सहन करावा लागत आहे. ग्रामीण भागात विविध मूलभूत सुविधांची निर्मिती करण्यावर आपला

सुविधांच्या निर्मितीला प्राधान्य
रमेश बंग : भरतवाडा येथे सामाजिक सभागृहाचे लोकार्पण
हिंगणा : ग्रामीण भागातील नागरिक अजूनही काही मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. त्यामुळे त्यांना त्रासही सहन करावा लागत आहे. ग्रामीण भागात विविध मूलभूत सुविधांची निर्मिती करण्यावर आपला सर्वाधिक भर असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री रमेश बंग यांनी केले.
नागपूर (ग्रामीण) तालुक्यातील भरतवाडा येथील सामाजिक सभागृहाचे रमेश बंग यांच्या हस्ते नुकतेच लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच धनराज तोटे होते. प्रमुख अतिथी म्हणून चिंधबा मोरे, सुरेश नेऊल, प्रदीप मोरे, नामदेव मोरे, पंढरी मोरे, मधुकर कानफाडे, शेषराव ताडनकर, अरुण पुरी, शामराव नेऊल, धनराज मोरे, दिलीप बमनोटे, सुखदेव बमनोटे, भय्या पुरी, मनोहर कुंभरे, मोहन मोरे, दिनेश मलिये, चंद्रशेखर मोरे, शेषराव मोरे, गणपत पालेकर, हेमराज मोरे, गजानन इवनाते, रवींद्र नेऊल, संजय कापगते, रमेश पालेकर, कुंडलिक मोरे, मधुकर मोरे, भिकू नेऊल, नारायण शेडाके, भारत गजभिये आदी उपस्थित होते. यावेळी बंग म्हणाले, भरतवाडा येथील सामाजिक सभागृहाच्या निर्मितीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधान परिषद सदस्य विद्या चव्हाण यांच्या स्थानिक विकास निधीतून निधी उपलब्ध करून देण्यात आला. ग्रामीण भागातील विविध विकास कामांसाठी आपण कधीही निधी कमी पडू देणार नाही. मूलभूत सुविधांचा अभाव असल्यास ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास होऊ शकत नाही. ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास करणे, हे आपले ध्येय असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
कार्यक्रमाला अजय मानकर, महेश पुरी, महेश टेकाडे, भगवान तेलुटे, भाऊराव नेऊल, मंगेश मोरे, विलास पुरी, संदीप मोरे, शुभम पुरी, सागर वंजारी, राहुल मोरे, प्रदीप नेऊल, रुकेश नेऊल, प्रशांत नेऊल, संदीप नेऊल, सचिन नेऊल, तुषार मोरे, स्वप्नील शिंदे, स्नेहल मोरे, शुभम तोटे, अनिकेत पुरी, अमोल ताटे, अमोल काकडे, सुनील सातपुते, मधुकर पालेकर, दिलीप ढोले, आकाश फुलझेले, सुरेश मोरे, हरीश मोरे यांच्यासह स्थानिक ग्रामपंचायत सदस्य व नागरिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)