शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

आजच्या राजकारणातील नीतीमूल्ये हरविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2019 11:54 IST

आजच्या राजकारणात नीतीमत्ता हरविली आहे, राजकारणात गढूळपणा आला आहे, अशी टीका ज्येष्ठ पत्रकार व विचारवंत मधुकर भावे यांनी केली.

ठळक मुद्देयशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे शंकरराव, राजारामबापू व अण्णाभाऊ जन्मशताब्दी व्याख्यान

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शंकरराव असो, यशवंतराव असो, जुन्या नेत्यामधील मूल्याधिष्ठित, नीतीमत्ता आज आठवली व अनुसरली जाते. आजच्या राजकारणात ती राहिली नाही. रात्री एका पक्षात असलेला नेता सकाळी दुसऱ्याच पक्षात दिसतो. विचार, तत्त्व हद्दपार झाले आहेत. आजच्या राजकारणात नीतीमत्ता हरविली आहे, राजकारणात गढूळपणा आला आहे, अशी टीका ज्येष्ठ पत्रकार व विचारवंत मधुकर भावे यांनी केली.यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान विभागीय केंद्र, नागपूरच्यावतीने शंकरराव चव्हाण, राजारामबापू पाटील व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त भावे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. धनवटे सभागृह, शंकरनगर येथे आयोजित सोहळ्यात अध्यक्षस्थानी गिरीश गांधी, चंद्रकांत वानखडे, कवी डॉ. सागर खादीवाला, अनंतराव घारड, काँग्रेस शहराध्यक्ष विकास ठाकरे, उमाकांत अग्निहोत्री, पत्रकार श्रीकांत बेनी आदी उपस्थित होते. मधुकर भावे पुढे म्हणाले, इतिहासात डोकावून बघितल्यास माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, शंकरराव चव्हाण, वसंतदादा पाटील व विलासराव देशमुख या चार खांबावर महाराष्ट्र राज्य उभे असल्याचे दिसेल. शंकरराव चव्हाण यांनी राज्यात तब्बल ३६ धरणे बांधली आहेत. खºया अर्थाने अर्ध्या महाराष्ट्राची तहान भागविली. जायकवाडी प्रकल्पाला केंद्र शासनाचा विरोध असताना अधिकाऱ्यांना पाठविण्यापेक्षा त्यांनी स्वत: जाऊन बाजू मांडली व धरण मंजूर करून घेतले. आज हे धरण महाराष्ट्राची शान आहे.विदर्भातील गोसेखुर्द प्रकल्पालाही त्यांनी मजबुती दिली. दुसरीकडे राजारामबापू पाटील यांनीही जनतेसाठी प्रचंड कष्ट उपसले, शेतकऱ्यांसाठी पदयात्रा काढल्या. दुष्काळी भागात नळयोजना आणली. सहकार क्षेत्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी भगीरथ प्रयत्न केले. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याला तोड नाही. प्रबोधन साहित्याच्या माध्यमातून दलित, शोषितांचे दु:ख त्यांनी जगासमोर मांडले. ते हे करू शकले कारण त्यांच्या नीतीमत्ता होती. लोकहितासाठी त्यांनी राजकीय द्वेष बाजूला ठेवला. या तीन सुपुत्रांनी महाराष्ट्राची सांस्कृतिक व सामाजिक जडणघडण केली, अशी भावना मधुकर भावे यांनी व्यक्त केली. शंकरराव चव्हाण यांचे म्हणणे तत्कालीन प्रमुखांनी ऐकले असते तर कदाचित शीख दंगली आणि बाबरी विध्वंस झाला नसता, असा उल्लेख त्यांनी केला.गिरीश गांधी यांनी राजारामबापू व शंकरराव चव्हाण यांच्यासोबतचे अनुभव कथन केले. प्रास्ताविक चंद्रकांत वानखडे यांनी केले. संचालन प्रा. कोमल ठाकरे यांनी केले. रेखा दंडिगे-घिया यांनी आभार मानले.

टॅग्स :Socialसामाजिक