शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
4
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
5
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
6
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
7
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
8
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
9
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
10
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
11
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
13
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
14
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
15
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
16
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
17
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
18
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
19
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
20
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन

कायद्यापेक्षा तत्त्वांची बंधने महत्त्वाची : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2018 22:35 IST

नव्या समाज माध्यमांवर अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरेपूर वापर होत असून चांगल्यासोबत विघातक परिणामही समाजाला सहन करावे लागत आहेत. याला आवरणारे कायदेही नाहीत आणि सामाजिक प्रणालीत तशी तत्त्वेही तयार झाली नाहीत. तंत्रज्ञानाद्वारे यावर निर्बंध घालणे भविष्यात शक्यही होईल. मात्र त्यातून व्यक्तिस्वातंत्र्यावर निर्बंध येण्याची शक्यता आहे. समाजात एकमेकांशी वागण्यासाठी प्रत्येक गोष्टींचे कायदे नाहीत, पण सामाजिक तत्त्वांमधून आपण चांगले-वाईट शिकत असतो. तसेच नव्या माध्यमांच्या अभिव्यक्तीच्या नियंत्रणासाठी कायद्यापेक्षा तत्त्वांची बंधने महत्त्वाची ठरतील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

ठळक मुद्दे‘फेक न्यूज’ वर कार्यशाळा

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नव्या समाज माध्यमांवर अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरेपूर वापर होत असून चांगल्यासोबत विघातक परिणामही समाजाला सहन करावे लागत आहेत. याला आवरणारे कायदेही नाहीत आणि सामाजिक प्रणालीत तशी तत्त्वेही तयार झाली नाहीत. तंत्रज्ञानाद्वारे यावर निर्बंध घालणे भविष्यात शक्यही होईल. मात्र त्यातून व्यक्तिस्वातंत्र्यावर निर्बंध येण्याची शक्यता आहे. समाजात एकमेकांशी वागण्यासाठी प्रत्येक गोष्टींचे कायदे नाहीत, पण सामाजिक तत्त्वांमधून आपण चांगले-वाईट शिकत असतो. तसेच नव्या माध्यमांच्या अभिव्यक्तीच्या नियंत्रणासाठी कायद्यापेक्षा तत्त्वांची बंधने महत्त्वाची ठरतील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, नागपूर श्रमिक पत्रकार संघ, नागपूर प्रेस क्लब आणि प्रियदर्शिनी इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी अ‍ॅन्ड इंजिनिअरिंग यांच्या संयुक्त विद्यमाने प्रेस क्लबच्या सभागृहात ‘फेक न्यूज: परिणाम आणि दक्षता’ या विषयावर पत्रकारांसाठी आयोजित कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह, नागपूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष शिरीष बोरकर, नागपूर प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रदीप मैत्र, सचिव ब्रह्माशंकर त्रिपाठी, पीआयटीईचे प्राचार्य डॉ. विवेक नानोटी, पत्रकार राहुल पांडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.फडणवीस पुढे म्हणाले, भारतीय संविधानाने प्रत्येक व्यक्तीला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार दिला आहे. जसजसा इंटरनेटचा वापर वाढला आहे तसतसे लोकांना अभिव्यक्त होण्यासाठी माध्यमे देखील मिळू लागली. ही संवादाची समाज माध्यमे उपलब्ध झाल्याने लोकांच्या आशाआकांक्षा व अपेक्षा या माध्यमावर व्यक्त होऊ लागल्या व अभिव्यक्तीचा आनंद प्रत्येकजण पुरेपूर घेऊ लागला. हे चांगले असले तरी आज फेक न्यूजमधून अफवा पसरविण्यासाठी या माध्यमांचा वापर होऊ लागला आहे. त्याची कुठलीही शहानिशा न करता लोक एकमेकांना पाठवतात. हे संदेश अफवांचे रूप घेतात आणि दोन समाज एकमेकांच्या समोर उभे ठाकून निर्माण होणाऱ्या दंगली आपण अनुभवल्या आणि माणसे जनावरांपेक्षा कशी हिंसक होतात ते पाहिले आहे. समाज हा संक्रमणावस्थेतून जात आहे, अशावेळी शाश्वत तत्त्वे सांभाळतांना युगानुकूल तत्त्वे निर्माण करावी लागतील. नव्या समाज माध्यमांचा वापर हा संसर्गजन्य आजारासारखा झाला आहे. हा संसर्ग चांगल्या कारणासाठी झाला तर या तत्त्वामधून सदृढ समाज निर्मितीसाठी उपयोग होईल. त्यासाठी समाज प्रबोधन करून युगानुकूल तत्त्वे निर्माण करण्यासाठी माध्यमांनी जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन त्यांनी केले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसFake Newsफेक न्यूज