"मुख्याध्यापकांनी मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती अर्ज महाडीबीटी प्रणालीत नोंदवावेत"

By आनंद डेकाटे | Published: February 23, 2024 02:01 PM2024-02-23T14:01:40+5:302024-02-23T14:02:42+5:30

पाचवी ते सातवी व आठवी ते दहावीच्या अनुसूचित जातीच्या मुलींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती दिल्या जाते.

Principals should register pre-matric scholarship applications in the MahaDBT system | "मुख्याध्यापकांनी मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती अर्ज महाडीबीटी प्रणालीत नोंदवावेत"

"मुख्याध्यापकांनी मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती अर्ज महाडीबीटी प्रणालीत नोंदवावेत"

नागपूर : अनुसूचित जाती प्रवर्गातील मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती योजना २०२३-२४ पासून महाडीबीटीद्वारे ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येणार आहे. तेव्हा पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज महाडीबीटी प्रणालीमध्ये मुख्याध्यापकांनी तात्काळ नोदणी करावी, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांनी केले आहे.
या योजनेअंतर्गत इयत्ता पाचवी ते सातवी व आठवी ते दहावीच्या अनुसूचित जातीच्या मुलींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती दिल्या जाते.

साफसफाई व आरोग्यास धोकादायक क्षेत्रात काम करणाऱ्या पालकांच्या पाल्यांना मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती (अस्वच्छ व्यवसाय शिष्यवृत्ती) दिल्या जाते. इयत्ता नववी व दहावीत शिकणाऱ्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना भारत सरकार मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती, माध्यमिक शाळेतील अनुसूचित जातीच्या इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना गुणवत्ता शिष्यवृत्ती, इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना शिक्षण फी, परीक्षा फी आदींचा समावेश आहे. शिष्यवृत्तीसाठी योजनेंतर्गत https://prematric.mahait.org/Login/Login या संकेतस्थळावर शाळा व विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन अर्ज नोंदणी करण्याकरिता कार्यवाही करावी लागेल.

Web Title: Principals should register pre-matric scholarship applications in the MahaDBT system

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.