वेतनासाठी प्राचार्या हायकोर्टात

By Admin | Updated: November 19, 2016 02:46 IST2016-11-19T02:46:39+5:302016-11-19T02:46:39+5:30

एका महिला प्राचार्याने थकीत वेतनासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली आहे.

In the Princeton High Court for the salary | वेतनासाठी प्राचार्या हायकोर्टात

वेतनासाठी प्राचार्या हायकोर्टात

याचिका दाखल : उच्च शिक्षण विभागाला नोटीस
नागपूर : एका महिला प्राचार्याने थकीत वेतनासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली आहे.
न्यायमूर्तीद्वय वासंती नाईक व स्वप्ना जोशी यांनी शुक्रवारी प्रकरणावर सुनावणी केल्यानंतर उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे सचिव, उच्च शिक्षण सहसंचालक, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आणि वैनगंगा बहुउद्देशीय विकास संस्था यांना नोटीस बजावून २ डिसेंबरपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिलेत.
डॉ. वृंदा करंजेकर असे प्राचार्यांचे नाव असून त्या पालांदूर (भंडारा) येथील वैनगंगा बहुउद्देशीय विकास संस्थेद्वारे संचालित शिवाजी महाविद्यालयात कार्यरत आहेत. १२ जुलै २०१६ रोजीच्या ‘जीआर’नुसार डोंगराळ, आदिवासी व ग्रामीण भागातील महाविद्यालयांमधील प्राचार्यांच्या सेवानिवृत्तीचे वय ६५ वर्षे करण्यात आले आहे. करंजेकर यांना हा ‘जीआर’ लागू होतो. यामुळे शिक्षण संस्थेने त्यांना वयाची ६२ वर्षे पूर्ण केल्यानंतरही पदावर कायम ठेवले आहे. त्यानुसार करंजेकर यांच्या वेतनाचे बिल शिक्षण विभागाकडे पाठविण्यात आले. परंतु, त्यावर काहीच निर्णय घेण्यात आला नाही. यामुळे करंजेकर यांनी उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली आहे.
शासनाने वेतन थांबवून ठेवणे अवैध असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. करंजेकर यांच्यातर्फे अ‍ॅड भानुदास कुलकर्णी यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)

Web Title: In the Princeton High Court for the salary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.