मनपा व नागपूर शहराचा अभिमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:10 AM2021-03-04T04:10:09+5:302021-03-04T04:10:09+5:30

महापौर दयाशंकर तिवारी : मनपाचा ७० वाा स्थापना दिन लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागपूर शहराला वैभवशाली ...

Pride of Municipal Corporation and Nagpur city | मनपा व नागपूर शहराचा अभिमान

मनपा व नागपूर शहराचा अभिमान

googlenewsNext

महापौर दयाशंकर तिवारी : मनपाचा ७० वाा स्थापना दिन

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : नागपूर शहराला वैभवशाली इतिहास आणि गौरवशाली परंपरा आहे. आापले शहर आता सर्वच बाबतीत पुढे जात आहे. जगाच्या नकाशावर झळकू लागले आहे. शहर विकासात महापालिकेची महत्त्वाची भूमिका आहे. मनपानेच राज्याला व देशाला मार्गदर्शक ठरतील असे नेतृत्व दिले आहे, अशा आपल्या नागपूर शहराचा सार्थ अभिमान असल्याचे गौरवोद्गार महापौर दयाशंकर तिवारी यांनी काढले.

महापालिकेच्या ७०व्या स्थापना दिनानिमित्त मंगळवारी मनपा मुख्यालयातील हिरवळीवर आयोजित कार्यक्रमात महापौरांनी बॅरिस्टर शेषराव वानखेडे यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. तसेच डॉ.पंजाबराव देशमुख सभागृहात त्यांच्या प्रतिमेला माल्यार्पण केले. १८६४ मध्ये नागपूर नगरपालिकेची स्थापना झाली. होती व पुढे १९५१ मध्ये नागपूर महानगरपालिका म्हणून अस्तित्वात आली. महानगरपालिका म्हणून नागपूर शहराचे पहिले महापौर म्हणून बॅरिस्टर शेषराव वानखेडे यांनी नेतृत्व केले. आज त्याच महानगरपालिकेचा ५४ वा महापौर म्हणून अभिमान आहे. बॅरि. शेषराव वानखेडे यांची कन्या कुंदाताई विजयकर यांना शहराची पहिली महिला महापौर होण्याचा मान मिळणे हा त्यांच्या कार्याचा सन्मान असल्याचे महापौर म्हणाले.

यावेळी उपमहापौर मनीषा धावडे, स्थायी समिती सभापती विजय झलके, सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, बसपा गटनेत्या वैशाली नारनवरे, जलप्रदाय समिती सभापती संदीप गवई, महिला व बालकल्याण समिती सभापती दिव्या धुरडे, दुर्बल घटक समिती सभापती कांता रारोकर, विधी समिती सभापती अ‍ॅड. मीनाक्षी तेलगोटे, शिक्षण समिती सभापती प्रा. दिलीप दिवे, स्थापत्य समिती सभापती राजेंद्र सोनकुसरे, क्रीडा समिती सभापती प्रमोद तभाने, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, अतिरिक्त आयुक्त संजय निपाणे, उपायुक्त निर्भय जैन, रवींद्र भेलावे, राजेश भगत, निगम सचिव डॉ. रंजना लाडे, झोन सभापती उपस्थित होते.

....

‘सुपर-७५’ला आयुक्तांची साथ

२६ जानेवारीला मनपाच्या विद्यार्थ्यांसाठी सुपर-७५ ही संकल्पना मांडली. या संकल्पनेंतर्गत आठव्या वगार्तील विद्यार्थ्यांची परीक्षा घेऊन त्यामधून ७५ विद्यार्थ्यांची निवड करणे व त्यानंतर त्यांची बुध्यांक चाचणी घेणे. त्यानुसार २५ अभियंता, २५ डॉक्टर व २५ एनडीए अधिकारी बनू शकतील, या दृष्टीने त्यांना शिक्षण उपलब्ध करण्याच्या दृष्टीने कार्यवाहीसुद्धा सुरू झालेली आहे. याला मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांचीही साथ असल्याचे महापौरांनी सांगितले.

Web Title: Pride of Municipal Corporation and Nagpur city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.