साेयाबीनचे दर साडेतीन हजारांवर;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:08 IST2021-09-26T04:08:30+5:302021-09-26T04:08:30+5:30

शेतकरी म्हणतात, पीक परवडेना! जाेड-१ खोऱ्याने पैसा ओतला, आता काय करू? सध्या बाजारात व शेतकऱ्यांकडे उपलब्ध असलेले साेयाबीनचे बियाणे ...

The price of soybeans is over three and a half thousand; | साेयाबीनचे दर साडेतीन हजारांवर;

साेयाबीनचे दर साडेतीन हजारांवर;

शेतकरी म्हणतात, पीक परवडेना! जाेड-१

खोऱ्याने पैसा ओतला, आता काय करू?

सध्या बाजारात व शेतकऱ्यांकडे उपलब्ध असलेले साेयाबीनचे बियाणे हे विविध राेग व किडींना बळी पडणारे आहे. त्यामुळे साेयाबीनचा उत्पादन खर्च वाढत चालला आहे. साेबतच प्रती एकर उत्पादनही घटत चालले आहे. याच्या तुलनेत साेयाबीनला बाजारात कमी भाव मिळताे. साेयाबीनला एकरी किमान १२ ते १४ हजार रुपये खर्च येताे. तीन ते चार क्विंटल उत्पादन हाेते. त्यामुळे साेयाबीनचे पीक आता परवडणारे राहिले नाही.

रामचंद्र डांगरे, बेला.

...

अलीकडे कीड व राेगांसाेबतच पाण्याचा ताण आणि परतीच्या पावसामुळे साेयाबीनच्या पिकाचे प्रचंड नुकसान हाेत आहे. जगात राेग व कीड प्रतिबंधक तसेच कमी व अती पाऊस राेधक ‘जीएम’ (जेनेटिकली माॅडिफाईड) बियाणे विकसित करण्यात आली आहेत. या बियाण्यांची उत्पादकता अधिक असून, उत्पादन खर्च कमी आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करावयाचे असेल तर केंद्र सरकारने ‘जीएम’ बियाण्यांवरील बंदी हटवून शेतकऱ्यांना ‘जीएम’ बियाणे वापरण्यास परवानगी द्यायला हवी.

- राजेंद्र इंगाेले, काेळंबी (खानगाव).

....

विकण्याची घाई करू नका!

सध्या साेयाबीनचे दर घटत चालले आहेत. नवीन साेयाबीनमध्ये माेठ्या प्रमाणात ओलावादेखील आहे. त्यामुळे साेयाबीनला ३,८०० ते ४,७०० रुपये प्रती क्विंटल भाव मिळत आहे. नवरात्र उत्सवानंतर साेयाबीनचे दर वाढतील. दिवाळीच्या आसपास किंवा त्यानंतर साेयाबीनचे भाव प्रती क्विंटल ५,००० ते ६,००० रुपये हाेण्याची शक्यता आहे.

- कमलाकर घाटाेळे, कळमना मार्केट, नागपूर.

...

विकण्याची घाई करू नका!

साेयाबीनचे दर कमी-अधिक उत्पादनावर अवलंबून नसतात. जागतिक बाजारातील साेयाबीन ढेपेच्या तेजी व मंदीवर अवलंबून असतात. त्याअनुषंगाने सध्या आपल्याकडे प्रती क्विंटल ५,००० ते ६,००० रुपये भाव असायला हवे. मात्र, ओलावा भरमसाट असल्याने तसेच अधिक ओलावा असलेली साेयाबीन मिलिंग करण्यास याेग्य नसल्याने सध्या दर खाली आले आहेत. दीड-दाेन महिन्यांची जागतिक पातळीवर ढेपेच्या बाजारात तेजी आल्यास आपल्याकडील दर वाढू शकतात.

- सुमित चांडक, आयटीसी, काटाेल.

....

Web Title: The price of soybeans is over three and a half thousand;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.