शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
3
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
4
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
5
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
6
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
7
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
8
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
9
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
10
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
11
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
12
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
13
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
14
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
15
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
16
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
17
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
18
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
19
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
20
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप

कांद्याला हवा २० रुपये भाव; कांदा उत्पादक संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2020 11:10 IST

शासनाने कांदा 20 रुपये प्रति किलो भावाने खरेदी करावा तसेच कांदा खरेदी नाशिक जिल्ह्यासह विदर्भात सुरू करावी, अशी मागणी शेतकरी संघटना आणि महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने केली आहे.

ठळक मुद्देनाफेड करणार नऊ रुपये दराने खरेदी

सुनील चरपेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आठ महिन्यापूर्वीच्या अतिवृष्टीनंतर राज्यातील नाशिक व अकोला जिल्ह्यात रबीच्या कांद्याचे बंपर उत्पादन झाले.त्यातच कोरोना व सरकारी धोरणांमुळे कांद्याचे घाऊक भाव 210 रुपयांवरून 5 ते 7 रुपयांपर्यंत कोसळले. दरम्यान, केंद्र सरकारने नाफेडच्या माध्यमातून शेतकऱ्यांकडील कांदा 9 रुपये प्रति किलो भावाने खरेदी करण्याचा निर्णय घेतला. शासनाने हा कांदा 20 रुपये प्रति किलो भावाने खरेदी करावा तसेच कांदा खरेदी नाशिक जिल्ह्यासह विदर्भात सुरू करावी, अशी मागणी शेतकरी संघटना आणि महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने केली आहे.देशातील एकूण कांदा उत्पादनात महाराष्ट्राचा 37 टक्के आणि नाशिक जिल्ह्याचाक 10 टक्के वाटा आहे. सोबतच पुणे, सातारा, अहमदनगर, सोलापूर, धुळे व अकोला जिल्ह्यातही कांद्याचे मोठे उत्पादन होते. आॅगस्ट-सप्टेंबर 2019 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील 85 ते 99 टक्के कांदा शेतातच सडल्याने एकरी उत्पादन 5 ते 10 क्विंटल झाले. त्यामुळे किरकोळ बाजारात कांद्याचे भाव आकाशाला भिडले होते.सामान्य ग्राहकांचे हित लक्षात घेता केंद्र सरकारने सप्टेंबर 2019 मध्ये कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेत त्यावर लगेच अंमलबजावणी केली. रबी हंगामात कांद्याचे उत्पादन वाढल्याने केंद्र सरकारने ही निर्यातबंदी हटविण्याचा निर्णय घेतला. त्याअनुषंगाने केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी 26 फेब्रुवारी 2020 रोजी अधिसूचना जारी केली. वाणिज्य मंत्रालयाने या अधिसूचनेला 2 मार्च रोजी मंजुरी दिली. प्रत्यक्षात कांद्यावरील निर्यातबंदी 15 मार्च हटविण्यात आली आणि निर्यात प्रक्रिया सुरू झाली. या काळात नाशिकच्या बाजारपेठेत कांद्याचे भाव 13 ते 16 रुपये प्रति किलो होते.या अधिसूचनेमुळे कांद्याचे भाव 19 रुपये प्रति किलोपर्यंत चढले होते. भाव वाढल्याने शेतकऱ्यांनी साठवून ठेवलेला कांदा बाजारात आणला. मागणीच्या तुलनेत आवक वाढल्याने कांद्याचे भाव कमालीचे कोसळले. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने नाफेडच्या माध्यमातून शेतकऱ्यांकडील कांदा 9 रुपये प्रति किलो भावाने खरेदी करण्याचा निर्णय घेतला. वास्तवात, नाफेडने कांदा खरेदीला अद्याप सुरुवात केली नाही. नऊ रुपये प्रति किलो भाव परवडण्याजोगा नसल्याने शासनाने 20 रुपये प्रति किलो भावाने कांदा खरेदी करावा. हा कांदा सामान्य ग्राहकांना वाजवी दरात उपलब्ध शकतो, अशी माहिती तेल्हारा (जिल्हा अकोला) येथील कांदा उत्पादक तथा शेतकरी संघटनेच्या सोशल मीडिया आघाडीचे राज्य प्रमुख विलास ताथोड आणि महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे राज्याचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी दिली.50 हजार टन खरेदीचे उद्दिष्टनाफेड या हंगामात शेतकऱ्यांकडून 50 हजार टन कांदा खरेदी करणार आहे. यात नाशिक जिल्ह्यातील 45 हजार टन आणि गुजरातमधील 5 हजार टन कांद्याचा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात ही खरेदी लासलगाव, पिंपळगाव व कळवण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून केली जाणार आहे. नाफेडचे मागील वर्षी 57 हजार टन कांदा खरेदीचे उद्दिष्ट होते.निर्यात व मागणी घटलीकोरोनामुळे हॉटेल्स बंद असल्याने कांद्याची देशांतर्गत मागणी घटली आहे. शिवाय, नियार्तीसाठी पुरेसे जहाज उपलब्ध नाहीत. कांदा नियार्तीला वातानुकूलित कंटेनरची आवश्यकता असते. कोरोनामुळे कंटेनरला परतीचे भाडे मिळत नाही. त्यामुळे कांदा निर्यातदारांना कंटेनरचे जाणे व परत येण्याचे भाडे द्यावे लागते. ते त्यांना परवडणारे नाही.नाफेडने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडील कांदा शेवटच्या गोणीपर्यंत खरेदी करावा. यावर्षी अकोला जिल्ह्यात सात हजार एकरमध्ये कांद्याची लागवड केली होती. एकरी 100 ते 150 क्विंटल उत्पादन झाले आहे. हा कांदा साठवून ठेवण्यासाठी अकोला जिल्ह्यात कांदा चाळ नाही. त्यामुळे नाफेडने नाशिकसोबतच अकोला जिल्ह्यात 20 रुपये प्रति किलो भावाने कांदा खरेदी करावा.विलास ताथोड,कांदा उत्पादक तथा सोशल मीडिया आघाडी प्रमुख, शेतकरी संघटना, महाराष्ट्र.केंद्र सरकारने सप्टेंबर 2019 मध्ये कांद्यावर निर्यातबंदी लावली व लगेच अंमलबजावणी केली. ही निर्यातबंदी उठवताना तात्काळ अंमलबजावणी केली नाही. अधिसूचना जारी करणे व निर्यात प्रक्रिया खुली होणे यात 20 ते 22 दिवस गेले. सरकारच्या या दिरंगाईमुळे एकीकडे संभ्रम निर्माण झाला तर दुसरीकडे बाजारात आवक वाढली. त्यामुळे भाव कोसळले. आता सरकारने 20 रुपये प्रति किलो भावाने शेतकऱ्यांकडील कांदा खरेदी करावा.भारत दिघोळे,अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना.

टॅग्स :onionकांदाFarmerशेतकरी