भंडारा रोड ते प्रजापती चौकापर्यंत जड वाहनांना प्रतिबंध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:13 IST2021-09-10T04:13:06+5:302021-09-10T04:13:06+5:30

नागपूर : पारडी उड्डाणपूल आणि मेट्रोच्या कामामुळे एच.बी. टाउन चौक तसेच प्रजापतीनगर चौकातून भंडारा रोडकडे जाणारी वाहतूक नियंत्रित करणे ...

Prevention of heavy vehicles from Bhandara Road to Prajapati Chowk | भंडारा रोड ते प्रजापती चौकापर्यंत जड वाहनांना प्रतिबंध

भंडारा रोड ते प्रजापती चौकापर्यंत जड वाहनांना प्रतिबंध

नागपूर : पारडी उड्डाणपूल आणि मेट्रोच्या कामामुळे एच.बी. टाउन चौक तसेच प्रजापतीनगर चौकातून भंडारा रोडकडे जाणारी वाहतूक नियंत्रित करणे कठीण झाले आहे. यामुळे या मार्गावर जड वाहनांना प्रवेश देण्यावर निर्बंध घालण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिल्याची माहिती आ. कृष्णा खोपडे यांनी दिली आहे.

खोपडे यांच्या उपस्थितीमध्ये गुरुवारी महामेट्रो, एनएनएआय तसेच पोलीस आयुक्तांची बैठक झाली. यात, पारडी उड्डाणपूल तसेच मेट्रो रेल्वेचे काम भंडारा रोडवर सुरू झाल्याचे सांगण्यात आले. यामुळे पारडी पुलाचे काम मंदगतीने सुरू असून, नागरिकांना बराच त्रास सहन करावा लागत असल्याचे सांगण्यात आले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील यावर नाराजी व्यक्त केली आहे. सिमेंट रोडचे काम अपूर्ण आहे. मात्र एच.बी.टाऊन चौक, प्रजापतीनगर चौक, पारडी जुना पूल व बाजार चौकात वाहतुकीवर ताण आल्यामुळे अपघाताची भीती व्यक्त होत आहे. यावर बैठकीत बरीच दीर्घ चर्चा झाली. अधिकाऱ्यांना काम तातडीने पूर्ण करण्यासाठी सांगितल्याची माहिती खोपडे यांनी दिली.

Web Title: Prevention of heavy vehicles from Bhandara Road to Prajapati Chowk