पूजा चव्हाण प्रकरणात पोलिसांवर दबाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:08 IST2021-02-15T04:08:06+5:302021-02-15T04:08:06+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात ‘ऑडियो क्लिप्स’ एकदम स्पष्ट आहेत. त्यातील आवाज कुणाचा आहे हेदेखील ...

Pressure on police in Pooja Chavan case | पूजा चव्हाण प्रकरणात पोलिसांवर दबाव

पूजा चव्हाण प्रकरणात पोलिसांवर दबाव

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात ‘ऑडियो क्लिप्स’ एकदम स्पष्ट आहेत. त्यातील आवाज कुणाचा आहे हेदेखील सर्वांना माहिती आहे. मात्र पोलिसांकडून यासंदर्भात गंभीरतेने कारवाई केलेली नाही. पोलिसांवर कुठला तरी मोठा दबाव आहे, असा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. नागपुरात रविवारी प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते.

या प्रकरणात कॅबिनेटमधील मंत्र्याचे नाव येत आहे. मात्र जोपर्यंत पोलीस कारवाई करत नाहीत, तोपर्यंत त्यांना खुले मैदान आहे. त्यामुळे पोलिसांनी अगोदर गुन्हा दाखल केला पाहिजे. कॅबिनेटमध्ये राहून चौकशी होऊ शकत नाही. सत्य लोकांसमोर आले पाहिजे, असेदेखील फडणवीस म्हणाले.

हे प्रकरण मुख्यमंत्र्यांनी किती गांभीर्याने घेतले हेच लक्षात येत नाही. मुळात त्यांना यातील गांभीर्यच कळलेले नाही. त्यांनी योग्य व सखोल माहिती घ्यावी. त्यानंतरच त्यांना नेमके कुणाचे आयुष्य उद्ध्वस्त होत आहे हे कळेल, असे फडणवीस म्हणाले.

आमचे नेते कुठूनही निवडून येऊ शकतात

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यासंदर्भात फडणवीस यांनी भाष्य केले. सर्वांना कधी ना कधी गाव सोडून जावे लागते. मात्र ते दुसरीकडूनदेखील निवडून आले. आमचे राज्याचे नेते कुठूनही निवडून येऊ शकतात, असे त्यांनी प्रतिपादन केले.

Web Title: Pressure on police in Pooja Chavan case